Minister Abdul Sattar Politics : मुख्यमंत्र्यांकडून खोऱ्याने निधी ओढला, आता सत्तार प्रासंगिक करार कायम ठेवणार का ?

Shivsena News : सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी अब्दुल सत्तार यांच्यासाठी जणू राज्याची तिजोरीच खुली करून दिली.
Abdul Sattar Political News
Abdul Sattar Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : राज्याचे अल्पसंख्याक व पणनमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या धक्कादायक राजकारणासाठी ओळखले जातात. ग्रामपंचायतीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या सत्तारांनी सिल्लोड नगरपालिका आणि त्यानंतर सिल्लोड- सोयगाव (Sillod-Soygaon Constitunecy News) विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आपले पाय रोवले. काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत त्यांनी `हाता`ची साथ सोडली.

Abdul Sattar Political News
Maharashtra BRS Politics : बीआरएसचे गुलाबी वादळ थंडावले, नेतेही सुस्तावले...

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये विरोध होताच अनपेक्षितपणे शिवसेनेची वाट धरली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तार यांना राज्यमंत्रिपद बहाल करण्यात आले. ठाकरेंकडूनही सत्तारांनी मतदारसंघासाठी निधी आणि अनेक योजना मंजूर करून घेतल्या. परंतु एवढ्याने समाधान न झालेल्या (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत झालेल्या बंडात महत्त्वाची भूमिका वठवत (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांना साथ दिली.

सत्तेत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या शिंदेंनी अब्दुल सत्तार यांच्यासाठी जणू राज्याची तिजोरीच खुली करून दिली होती. गेल्या पंधरा वर्षांत सिल्लोड- सोयगाव मतदारसंघासाठी मिळाला नाही, एवढा निधी शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सत्तारांनी खेचून आणला. (Shivsena) पण महत्त्वाकांक्षी असलेल्या अब्दुल सत्तार यांचे समाधान झाले तर नवलच. कृषिमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी शिंदे यांनी सत्तारांवर टाकली होती, परंतु आपल्या वाचाळ स्वभावामुळे अवघ्या आठ महिन्यांतच सत्तारांना या पदावरून पायउतार व्हावे लागले.

कृषिमंत्री पद काढून घेतल्याचा राग सत्तार यांच्या मनात कायम असल्याचे वारंवार दिसून आले. जाहीर भाषण आणि कार्यक्रमातून सत्तार हे आपला कुठल्याही पक्षाशी कायमचा करार नसतो, तर तो प्रासंगिक असतो असे सांगितले. जिकडे सत्ता तिकडे मी, कारण माझ्या नावातच सत्ता आहे, असेही सत्तार मोठ्या अभिमानाने सांगतात. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून छत्रपती संभाजीनगरातून लढण्याची इच्छाही सत्तार यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे माहीत असतानाही केवळ चर्चेत राहण्यासाठी सत्तारांकडून अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जातात. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केलेल्या सत्तारांचा त्यांच्यासोबत केलेला प्रासंगिक करार येणाऱ्या लोकसभा आणि त्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत कायम राहणार ? की मग सत्तार नव्या पक्षाशी नवा प्रासंगिक करार करणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com