Dhananjay Munde Letter to Sattar : सत्तारसाहेब अधिकची पथक नेमा, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा..

Farmer News : कबड्डीच्या एका पिशवीची किंमत ८५० रूपयांच्या आसपास असताना २ हजार रुपयांना विक्री केली जाते.
Dhananjay Munde Letter to Sattar
Dhananjay Munde Letter to Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने अकोला येथील बोगस बियाणे विक्रेत्यांच्या दुकानांवर टाकलेल्या धाडीने वादंग निर्माण झाले. (Dhananjay Munde Letter to Sattar) खंडणीचे आरोप झाले असले तरी राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू असून शेतकऱ्यांची फसवणूक आणि पिळवणूक केली जात आहे. राज्याच्या विविध भागातून बोगस बियाणे विक्री, अतिरिक्त भावाने विक्री अशा असंख्य तक्रारी येत आहेत.

Dhananjay Munde Letter to Sattar
NCP Allegation On Tanaji Sawant: पालकमंत्री सावंत यांचा पोलिसांवर दबाव; भूम-परांड्याचा बिहार झालायं..

या संदर्भात राष्ट्रवादीचे माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना पत्र पाठवत कारवाईची मागणी केली आहे. मुंडे यांनी सत्तार यांना पाठवलेल्या पत्रात अनेक गैरप्रकाराचा दावा केला आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर विशेषतः सोयाबीन व कपाशी सारख्या जास्त मागणी असलेल्या बियाण्यांच्या वितरण प्रणाली मध्ये बोगस बियाण्यांचा राज्यभरात सुळसुळाट झाला आहे.

प्रसिद्ध ब्रँड्सची नावे वापरून चढ्या भावाने बोगस बियाणे विक्री करून (Farmers) शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. काही ठिकाणी धाडसत्रात कोट्यावधींचे बोगस बियाणे सापडले आहेत. यावर वेळीच नियंत्रण आणायची गरज आहे. कपाशीच्या बाबतीत आमच्या भागात कबड्डी नावाचा वाण लोकप्रिय आहे, कबड्डीच्या एका पिशवीची किंमत ८५० रूपयांच्या आसपास असताना २ हजार रुपयांना विक्री केली जाते.

शेतकऱ्यांनी मूळ किंमतीत मागितल्यास दुकानदार माल संपला म्हणून सांगतात. सोयाबीनच्या बियाण्याबाबतही हीच परिस्थिती आहे. ही पिळवणूक थांबवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी बोगसगिरी व साठेबाजीवर नियंत्रण मिळवणे अनिवार्य आहे. यासाठी अधिकची पथके नेमून थेट कारवाया करणे व अन्य आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com