NCP Allegation On Tanaji Sawant: पालकमंत्री सावंत यांचा पोलिसांवर दबाव; भूम-परांड्याचा बिहार झालायं..

Tanaji Sawant News: राष्ट्रवादीने सावंत यांच्याविरोधात उघड भूमिका घेतल्याने मतदारसंघातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Ncp Allegation on Tanaji Sawant
Ncp Allegation on Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News: राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तथा भूम परांड्याचे विद्यमान आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. (Ncp Allegation on Tanaji Sawant) तानाजी सावंत यांचा पोलिस खात्यासह विविध विभागातील वाढता हस्तक्षेप आणि त्यामुळे मतदारसंघात वाढलेली गुंडागर्दी पाहता भूम-परांड्याचा बिहार झाला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Ncp Allegation on Tanaji Sawant
Sanjay Raut Threat Case : मोठी बातमी ; राऊत धमकी प्रकरण बनाव ? आरोपी मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय..

पोलिस दबावात काम करत असल्याने धमकावणे, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यासारखे प्रकार घडत आहेत. राज्याचे मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, तसेच तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील मोटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

गेल्या काही महिन्यात भूम-परांडा येथे घडलेल्या घटनांचा दाखला देत मोटे यांनी सावंत यांच्यावर टीका केली आहे. (NCP) मोटे म्हणाले, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दबावामुळे पाेलिस खाते नरमले असून कारवाई करण्यास धजावत नाहीये. (Osmanabad) परिणामी गुंडांची भूम परांडा वाशी मतदारसंघात दहशत वाढू लागली आहे.

पालकमंत्री तानाजी सावंत यांचा पोलीस खाते व इतर खात्यात हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे भूम परांडा वाशी मतदारसंघात दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पवनचक्की चालकांना धमक्या देणे, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीवेळी सोलापूर जिल्ह्यातील उजनी येथे घडलेल्या घटनेत तानाजी सावंत यांच्या दबावापोटी पोलिसांनी योग्य कलम ने लावणे या प्रकारांमधून पोलिसांवर सावंत यांचा किती दबाव आहे हे स्पष्ट होते.

पोलिस आपलं काहीच वाकडं करू शकत नाही, हे लक्षात आल्याने गुंडांचा आत्मविश्वास वाढत आहे. यातूनच १२ जुन रोजी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर सावंत यांच्या बॉडिगार्डकडून हल्ला झाल्याचा आरोप देखील राहुल मोटे यांनी केला. यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भेट घेवून तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे मोटे यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीने सावंत यांच्याविरोधात उघड भूमिका घेतल्याने पुढील काही दिवसांत मतदारसंघातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com