Marathwada : जाती, धर्मातील प्रत्येक घटक आपण एक आहोत. विद्वेष पसरवणाऱ्यांपासून दुर राहून एकजुटीने त्यांना धडा शिकवला पाहिजे. (Sharad Pawar Appeal News) देश, समाज एकसंध राहण्यासाठी उपयुक्त असलेल्या लोकांना ताकद देऊन आपण या सर्वांवर मात करु शकतो, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सामाजिक आणि धार्मिक सौहार्द बैठकीत ते बोलत होते.
समाजाच्या आणि देशाच्या आजच्या स्थितीवर इथल्या लोकांची मते जाणून घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही मांडलेले प्रश्न देशाचे आहेत, आजचा दिवस विशेष आहे. (Sharad Pawar) साडेतीनशे वर्षापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. अठरा-पगड जातींना सोबत घेऊन राज्य स्थापन केले. (Ncp) जसे देवगिरीच्या यादवांचे राज्य असा उल्लेख केला जातो, तसे हे राज्य भोसल्यांचे नव्हते तर, रयतेचे राज्य त्यांनी निर्माण केले होते.
संसदीय लोकशाही या देशात आहे, याचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. शाहु महाराजांना सामाजिक जाण होती. आपण त्यापासून दुर जातो आहे कि काय? असे वाटते. संसदीय कार्यपद्धतीत संवाद कसा कमी झाला आहे. (Maharashtra) यावर माझ्या पुस्तकात एक चॅप्टरच आहे. आज सुसंवाद नाही, याचा विचारही त्याठिकाणी होत नाही, असे सांगतानाच पवार यांनी बाबरी मस्जीद प्रश्नावरील सुफळ संवादाची आठवण सांगितली.
आज सुसंवादाचा अभाव वारंवार दिसतो. संसदेला महत्व द्यायचे नाही, ही राज्यकर्त्यांची भूमिका योग्य नाही. नवीन संसद भवन बांधतानाही संवाद साधला नाही. राष्ट्रपतींना निमंत्रण नसल्याने आम्ही उद्घाटनावर बहिष्कार घातला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या संस्था आहेत. त्यांची प्रतिष्ठा संसदेतील सदस्यांनी नाही ठेवली तर, लोकही कसे ठेवतील. न्यायपालिकांची प्रतिष्ठाही राखली जावी,असेही पवार म्हणाले.
सामान्य लोकांवर माझा विश्वास आहे, असे सांगताना, केरळपासून मिझोरामपर्यंत भाजपला लोकांनी कसे नाकारले याचा उहापोह पवारांनी यावेळी केला. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणूकीत विरोधी पक्षांनीही त्या लोकांना विश्वास देण्याचे काम करायला हवे. नाहीतर मतदार तिसरा पर्याय स्विकारतील, असा इशारा देखील शरद पवारांनी दिला.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेतला, त्यानंतर दंगल झाली. याठिकाणी भेट दिल्यानंतर निर्णय तहकुब केला. दीड वर्षात महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहिल्यांदा संवाद नव्हता म्हणून विरोध झाला, नामविस्तारापुर्वी संवाद साधल्याने निर्णय मान्य झाला, यांची आठवण देखील पवारांनी यावेळी सांगितली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेचे पहिले सेशन झाले. त्यानंतर काढलेल्या फोटोत सगळे निर्वाचित सदस्य दिसत आहे. मात्र, नव्या संसदेच्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता सगळे भगव्या वस्त्रातील लोक दिसत आहेत. नव्या संसदेत पहिले पाऊल टाकण्याची संधी निर्वाचित सदस्यांना मिळायला हवी होती. असे सांगतानाच सदस्यांना डावलल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. आमदार राजेश टोपे, अंकुशराव कदम, आयोजक शेषराव चव्हाण, राजेंद्र दाते पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.