Maharashtra : राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा एकदा निघाला आहे. येत्या १९ जून पुर्वी हा रखडलेला विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. (Sanjay Shirsat On Cabinet expansion News) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब केल्याचे देखील बोलले जात आहे.
यावेळी मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकणार नाही? असा ठाम विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केला आहे. आता या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव आहे, की मग त्यांची बोळवण एखादे महामंडळ देवून केली जाणार याची चर्चा सुरू आहे. (Shivsena) राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्याच मंत्रीमंडळात जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली, विशेष म्हणजे ही तीनही कॅबिनेट आहेत.
त्यामुळे संजय शिरसाट यांच्या रुपाने जिल्ह्याला चौथा मंत्री मिळणार का? याबद्दल उत्सूकता आहे. संजय शिरसाट यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी दीड महिन्यापुर्वीच राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली होती. (Marathwada) शिरसाट ती नेटाने सांभाळत असल्याचे त्यांच्या अलीकडच्या पत्रकार परिषद, महाविकास आघाडीसह ठाकरे गटातील नेत्यांच्या टीकेला आक्रमकपणे दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरातून दिसून आले आहे.
विशेषतः राज्याच्या राजकारणात सध्या संजय विरुद्ध संजय असा सामना पहायला मिळतो आहे. मध्यंतरी शिरसाट यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे दुसरे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी टीका केली होती. त्यांना पक्षाची ध्येय धोरणं माहित नसतात, ते चुकीची भूमिका मांडतात या आरोपानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समेट घडवून आणला होता.
परंतु तेव्हापासून राज्य पातळीवर प्रवक्ते म्हणून केसरकर यांच्याऐवजी शिरसाट यांचीच चलती दिसून येत आहे. या जोरावर शिरसाट मंत्रीमंडळ विस्तारात आपले स्थान निश्चित करतात? की मग त्यांना पुन्हा डावलेले जाते हे लवकरच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेचे चार आणि भाजपचे सहा अशा एकूण दहा जणांचा समावेश या विस्तारात होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिरसाट यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.