औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले केला. कुलपती, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलतांना शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील आठवणींसह विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच्या घटनांना उजाळा दिला.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मी अंतकरणापासून विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील ऐतिहासिक विद्यापीठ आहे. मला या विद्यापीठाच्या निर्मितीचा कालखंड आठवतोय. (Ncp) तेव्हा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही मजबूत करण्याची मोठी कामगिरी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा विद्यापीठाशी मोठा संबंध होता.
या भागात त्या काळात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती नसताना बाबासाहेबांनी या कामात लक्ष घातले. ते स्वत: औरंगाबादला राहिले, मिलिंद महाविद्यालयाचा सर्व परिसर उभा करण्यात मोलाची कामगिरी केली. हा शैक्षणिक क्षेत्राच्या इतिहासाचा भाग आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या काळात जो संघर्ष झाला, त्याची किमंत मलाही मोजावी लागली होती, अशी आठवण देखील पवारांनी यावेळी सांगितली.
मराठावाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या निर्णयानंतर शरद पवार यांची सत्ता गेली होती. मराठवाडा म्हटलं की, शेती आणि सामान्य माणूस वेगळा संबंध आहे. शेती मर्यादित पिकांची होती आज ती बदलली जात आहे. उसाचा मोठा भाग असणारा भाग होत आहे. नवीन संशोधन कसं अंमलात आणता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
संस्थेच्या माध्यमातून अनेक काम होत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून नवीन प्रकल्प हाती घेतले जात आहेत. जालना आणि नागपूर भागात नवीन संशोधन संस्था सुरू करणार आहोत, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.