Beed Politics : पवारांच्या पक्षातील नेत्याची कार अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळली

Ncp Leader Ram Khades Car Burnt The Unknown Assailants : पवारांच्या पक्षातील नेत्याची कार का पेटवली? कोणी केला हल्ला?
Ram Khade Ncp
Ram Khade NcpSarkarnama
Published on
Updated on

Ncp Leader Ram Khade Ashti Beed News :

बीडमधील आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे राम खाडे यांची घराच्या अंगणात लावलेली कार अज्ञात इसमांनी गुरुवारी पहाटे पेट्रोल टाकून पेटवून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस Sharad Pawar पक्षाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष असलेले राम खाडे यांनी आष्टी तालुक्यातील हिंदू व मुस्लिम (वक्फ) देवस्थान जमिनीच्या घोटाळ्याबद्दल कायम तक्रारी केल्या आहेत. यामध्ये तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार राम खाडे यांनी केली आहे.

Ram Khade Ncp
Dhanjay Munde vs Karuna Munde : परळीमधून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढविणार; करुणा शर्मा-मुंडेंनी केली घोषणा

या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर यापूर्वी एक-दोन वेळा हल्लाही झाला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पोलिस संरक्षणही देण्यात आले आहे. नुकतीच कऱ्हे येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडली. यात राम खाडे यांच्या गटाने सर्व जागा जिंकत संस्था ताब्यात घेतली आहे. ( Beed Politics News )

गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास राम खाडे यांच्या आष्टा फाटा येथील निवासस्थानी अज्ञात चार ते पाच इसम घुसले. तोंडाला फडके बांधून हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन प्रवेश केला. हातातील पेट्रोल गाडीवर ओतून ती पेटवून दिली. तसेच गाडीवर दगडफेक करीत काचा फोडल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गाडीने पेट घेतल्यानंतर आग लागल्याचे दिसल्याने खाडे यांचे मोठे भाऊ यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. या वेळी गाडी पेटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली.

R

Ram Khade Ncp
Pankaja Munde News : 'धनंजय सोबत नव्हता तेव्हाही जिंकलो, आता फार फरक नाही...'; काय बोलून गेल्या पंकजा मुंडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com