BJP Loksabha News : मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार गट गाफील, भाजप झाला सक्रिय!

BJP starts prepration for all constituency of Loksabha election-भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी करणार उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांतून लोकसभा तयारीचा दौरा
CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawar & Vijay Choudhary
CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawar & Vijay ChoudharySarkarnama
Published on
Updated on

BJP Loksabha election News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत मश्गुल आहेत. भाजपने मात्र स्वबळावर उत्तर महाराष्ट्रातील आठही लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. बूथ स्तरापासून मेळावे सुरू करीत आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. (BJP prepared for loksabha election on it`s own for North Maharashtra)

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या दौऱ्यापाठोपाठ पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांनी उत्तर महाराष्ट्रातील (Nashik) लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक (Election) आढाव्यासाठी दौरा सुरू केला आहे.

CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawar & Vijay Choudhary
Shivsena Nashik News : ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून मोठी रसद!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री चौधरी उद्यापासून (ता.२५) सहा दिवसांचा उत्तर महाराष्ट्राचा संघटनात्मक दौरा करणार आहेत. महाविजय संकल्प २०२४ अभियानांतर्गत या दौऱ्यात विस्तारक कार्यशाळा, बूथ सशक्तीकरण अभियान, मेरी माटी मेरा देश, दिवार लेखन, सरल ॲप, संघटनात्मक बांधणी, सामाजिक समरसता, युवा वॉरियर शाखा आदी विषयांचा आढावा घेण्यात येईल.

या दौऱ्यात चौधरी उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांत बैठका घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील त्यात बूथ स्तरापासून पक्षाच्या बांधणीचा व निवडणुकीच्या तयारीचा भाग आहे. यातील सर्व कार्यक्रम भाजपचे पारंपरिक कार्यक्रम आहेत. अनेकदा हे कार्यक्रम होत असतात. प्रदेशाध्यक्ष यांनीदेखील अशा बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांचा प्रभाव किती यावरील चर्चा टाळली, तरी पक्ष सातत्याने सक्रिय राहण्यात त्याची मदत होते.

सध्या राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. त्यात सर्वात मोठा पक्ष भाजप असला तरी सत्तेत मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे. हे दोन्ही पक्ष सध्या गाफील असल्याने भाजप संघटनात्मक विस्तारासाठी त्याचा लाभ घेत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीचे संभाव्य चित्र काय असेल, याची चुणूक यातून दिसते.

CM Eknath Shinde, Dy CM Ajit Pawar & Vijay Choudhary
Nashik Drugs Politics : ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित राजकीय ‘बडी भाभी’ कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com