Vidhan Parishad : जागतिक महिलादिनीच आज विधान परिषदेत नव्या महिला धोरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर अनेक महिला सदस्यांनी आपले मत मांडल्यानंतर (Ncp) राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी काही सूचना केल्या. त्या करत असतांना सभागृहात उपस्थीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित होते.
यावर आज जागतिक महिलादिन (Womens Day) आहे, पण तुमच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाहीत. आमच्या उमा खापरे ताई चांगल्या काम करतात, आज त्यांच्या मंत्रीपदाची घोषणा करून त्यांना शपथ द्या, आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जागतिक महिलादिन मानता हे दाखवून द्या, असे आवाहन शिंदे यांनी केले. (Bjp) महिला धोरणाच्या प्रस्तावावर उमा खापरे यांनी आपले मत मांडले.
त्यानंतर शशिकांत शिंदे यांना बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी भाजपच्या मंत्रीमंडळात एकही महिला नसल्याची आठवण करून देत खापरे यांना मंत्री करण्याची मागणी करत भाजपची कोंडी केली. विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दोन्ही सभागृहातील महिला सदस्यांना दिल्या.
त्यात देत असतांनाच अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावण्याची संधी देखील हेरली. महिला दिनाच्या शुभेच्छा देतांना राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही, याबद्दल आपल्याला खंत वाटत असल्याचे म्हटले होते. शशिकांत शिंदे यांनी देखील विधान परिषदेत हाच मुद्दा उपस्थितीत करत उमा खापरे यांना मंत्री करण्याची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.