लाचखोर तहसिलदार शेळके कोणत्या नेत्याच्या आश्रयाला?

(Anti corruption bureau Raid in Paithan) आपल्या चेंबरमध्ये बसून असलेले शेळके नंतर फरार झाले आणि अद्याप ते पोलिस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेले नाहीत.
SDM Chandrakant Shelke
SDM Chandrakant ShelkeSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः पैठणचे लाचखोर तहसिलदार चंद्रकांत शेळके अजूनही फरार आहेत. विशेष म्हणजे रक्कम घेतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले होते, मग ते फरार कसे झाले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदरित या सगळ्या घटनाक्रमामुळे एसीबीच्या कारवाईबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. तीन दिवस उलटून गेले तरी शेळके एसीबीच्या हाती लागत नसल्यामुळे तो खरचं फरार आहे? की कुणाच्या आश्रयाला अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके आणि मध्यस्थ नारायण वाघ यांच्या मार्फत अतिवृष्टीमुळे शेतात वाहून आलेली वाळू उपसा करून वाहतूक करण्यासाठी एका शेतकऱ्याला दरहमहा १ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेळके यांच्या चेंबरमध्येच एसीबीच्या पथकाने नारायण वाघ याला ताब्यात घेतले होते. खंडणीची मागणी करताना तहसीलदार शेळके घटनास्थळीच होते, तरी देखील त्यांना अटक करण्यात आली नाही.

कारवाईत तत्परता दाखवणाऱ्या एसीबीने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करायला २७ तासांचा वेळ घेतला. नेमकं या सत्तावीस तासात असे काय घडले की? पथकाला प्रत्यक्ष खंडणी घेतांना आरोपींना अटक करण्याची संधी असतांना केवळ लाचेची मागणी करतांनाच छापा टाकण्यात आला. बरं छापा टाकल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल न करता त्यासाठी दुसरा दिवस उजाडावा लागला. त्यामुळे या प्रकरणात शेळके यांना वाचवण्यासाठी कुणीतरी मोठी राजकीय व्यक्ती काम करत होती, हे स्पष्ट होते?

राजकीय दबावाला बळी पडून आरोपींवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल न करतात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेळके यांना वाचवण्यासाठीच ही पळवाट शोधण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आपल्या चेंबरमध्ये बसून असलेले शेळके नंतर फरार झाले आणि अद्याप ते पोलिस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेले नाहीत. विशेष म्हणजे तहसिलदार शेळके यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना होती, की नव्हती? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जर एसीबीने या कारवाईची माहिती आणि शेळके फरार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले असेल तर मग जिल्हाधिकाऱ्यांनी शेळके यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे का? हा देखील प्रश्न आहे. शेळके यांचा पदभार सध्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याचे समजते. म्हणजे प्रकरण थंड बसत्यात गेल्यानंतर शेळके पुन्हा पैठणमध्येच तहसिलदार म्हणून आले तर आश्चर्य वाटायला नको, एवढ्या संशयास्पद घडामोडी तीन दिवसांपासून सुरू असल्याचे समजते.

SDM Chandrakant Shelke
पोटनिवडणूक ःप्रचाराचा धुराळा थांबला ; आता विजयाचा गुलाल कोण उधळणार?

जिल्हा आणि विभागातील तहसिलदार सारख्या मोठ्या पदावरील व्यक्तीवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्याची माहिती विभागीय आयुक्तांना देखील नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. वादग्रस्त शेळके यांच्याबद्दल अनेक तक्रारी असल्याचे बोलले जाते. गंगापूर, गेवराई , पैठण येथील वाळूपट्ट्यातून अवैध मार्गाने शेळके यांनी मोठी संपत्ती गोळा केलेल्याची चर्चा आहे. याची चौकशी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी करणार का? असा प्रश्न देखील या निमिताने उपस्थित केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com