Shirdi Saibaba News : जेजुरीच्या खंडेरायांनंतर आता शिर्डीचे साईबाबा तिष्ठले ‘शासन दारी’

Maharashtra Government : "शासन आपल्या दारी" हे नावीन्यपूर्ण अभियान राबवत आहे.
Shirdi Program of Maharashtra Government
Shirdi Program of Maharashtra GovernmentSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

राज्यातील जनतेच्या विविध प्रशासकीय अडचणी सोडवल्या जाव्या, योजनांचा लाभ मिळावा आणि सरकार सर्वसामान्यांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती आणि लाभ त्यांना मिळावा, अशा हेतूने शिंदे-फडणवीस-पवार महायुतीचे सरकार राज्यात विविध ठिकाणी "शासन आपल्या दारी" हे नावीन्यपूर्ण अभियान राबवत आहे.

या अभियानात सामान्य नागरिकांना नेमका किती प्रमाणात लाभ झाला, हे यथावकाश कळणार असले तरी सध्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत असलेले जिल्हास्तरीय भव्यदिव्य कार्यक्रम मात्र मुख्य अतिथींच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने सतत पुढे ढकलावे लागत आहे. या प्रकाराची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नगर जिल्ह्यात आज (ता. ११) होणारा"शासन आपल्या दारी" कार्यक्रम तिसऱ्यांदा पुढे ढकलावा लागला. आता हा कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे प्रशासन सांगत आहे. तरीही तो कार्यक्रम प्रत्यक्षात संपन्न होईपर्यंत शाश्वती नसल्याची उपरोधिक टीका विरोधकांकडून होत आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील कार्यक्रमही असाच अनेकदा पुढे ढकलण्यात आला असल्याचा संदर्भ यानिमित्ताने दिला जात आहे.

नगर जिल्ह्यात शिर्डीजवळ काकडी विमानतळ परिसरात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे, दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची उपस्थिती असणार आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा, यासाठी नियोजनाची जबाबदारी दिलेली आहे.

Shirdi Program of Maharashtra Government
Shirdi Lok Sabha : ठाकरे गटाचा शिर्डी लोकसभेसाठी उमेदवार ठरला; बडा मासा गळाला, काँग्रेसचेही बळ मिळणार

गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काकडी येथे सोयी सुविधांच्या नियोजनात लागलेली आहे. रेड कार्पेटसह जवळपास तीस हजार लाभार्थी बसू शकतील, असा पावसाळ्यात सुरक्षित असलेला शामियाना तयार करून ठेवला आहे. तीस हजार लाभार्थ्यांना आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ६०० बसेसचे नियोजन तयार आहे. मात्र तरीही शिर्डी (Shirdi) येथील कार्यक्रम पुन्हा - पुन्हा पुढे ढकलला जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com