शिवसैनिक आक्रमक : हिंगोलीत एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला

ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हे नाव वाढविले, मोठे केले, तेच नाव यापुढे वापरता येणार नसल्याने शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
 Eknath Shinde's statue
Eknath Shinde's statueSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याच्या निर्णयानंतर राज्यातील शिवसैनिक (Shiv Sainik) आक्रमक झाले आहेत. एकीकडे नेत्यांमध्ये जुंपलेली असताना शिवसैनिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा निषेध करण्यात येत आहे. हिंगोलीत (Hingoli) संतप्त शिवसैनिकांनी शिंदे यांचा पुतळा जाळत आपला राग व्यक्त केला आहे. (Shiv Sainik Aggressive : Eknath Shinde's statue burnt in Hingoli)

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी (ता. ८ ऑक्टोबर) धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी गोठविण्याचा निर्णय घेतला. तसेच, शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही, असे बंधन घातले आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हे नाव वाढविले, मोठे केले, तेच नाव यापुढे वापरता येणार नसल्याने शिवसैनिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

 Eknath Shinde's statue
संजय गायकवाडांचे पुन्हा वाद्‌ग्रस्त विधान; शिवसेनेला आई म्हणता ना?; मग तिला....

हिंगोलीत संतप्त शिवसैनिकांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला. तसेच, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या. निम का पत्ता कडवा है...एकनाथ शिंदे ... है अशा निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार हे दोन तोंडी आहेत. जिकडं पैसा आहे, तिकडे हे चालले आहेत, अशी टीकाही शिवसैनिकांनी पुतळा जाळताना केली.

 Eknath Shinde's statue
'सोमेश्वरचा सभासद होण्यास अजितदादांची चिठ्ठी लागत नाही; पण इंदापुरात सहकारी कारखाना खासगीप्रमाणे चालवतात'

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांना बंड केल्यानंतरही राज्यात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी संताप व्यक्त केला होता. त्यातूनच पुण्यातील कात्रज चौकात मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. तत्पूर्वी तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालयही फोडण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेला आव्हान देणारे आमदार संतोष बांगर यांनाही शिवसैनिकांनी हिसका दाखवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com