Arjun Khotkar News: शिवसेनेचा भाजपच्या महापौरांवर भरोसा नाय..? जालन्याच्या विकास निधीसाठी खोतकर नगरसेवकांना घेऊन थेट शिंदेंच्या दरबारात

Mahayuti Politics: राज्यात महायुती आणि त्यात भाजप-शिवसेना हे प्रमुख घटक पक्ष असताना नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यापैकीच एक जालन्याची महापालिका आहे.
Arjun Khotkar shivsena.jpg
Arjun Khotkar shivsena.jpgSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : राज्यात महायुती आणि त्यात भाजप-शिवसेना हे प्रमुख घटक पक्ष असताना नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. त्यापैकीच एक जालन्याची महापालिका आहे. भाजपाने इथे शिवसेनेला सोबत न घेता निवडणूक लढवली आणि 41 नगरसेवकांसह बहुमत पटकावले. सत्तास्थापनेत मित्रपक्षाची गरजच न भासल्याने शिवसेनेला बाहेर ठेवण्यात आले.

आता शहराच्या विकास कामांसाठी निधी देताना भाजपाकडून भेदभाव केला जाऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता आमदार अर्जुन खोतकर यांनी सावध पावित्रा घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार व जिल्ह्याचे लोकसभा प्रभारी संदीपान भुमरे यांच्यासोबत जालना महापालिकेतील शिवसेनेच्या सर्व 12 नगरसेवकांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात हजेरी लावली.

यापूर्वीही खोतकर यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना घेऊन मुंबईत जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन शहरातील विकास कामांवर चर्चा केली होती. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांना निधीअभावी ब्रेक लागू नये, अशी विनंती या भेटीत करण्यात आली होती. त्यानंतर आज मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जालना विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामांवर महत्त्वाची बैठक पार पडली.

अर्जुन खोतकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा शिंदे यांच्यासमोर मांडला. मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, शासकीय योजना तसेच शहर विकासाच्या विविध विषयांवर या बैठकीत चर्चा केली.

Arjun Khotkar shivsena.jpg
Harshvardhan Jadhav News: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिलासा; कोर्टाचा ॲट्रॉसिटी, धमकी प्रकरणात महत्वपूर्ण निर्णय

तसेच जालना शहर महानगरपालिकेतील नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागातील समस्या, गरजा व विकासाच्या संकल्पना थोडक्यात मांडत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. शिंदे यांनी जालना विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

Arjun Khotkar shivsena.jpg
Gokul Politics: महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? काँग्रेसच्या सतेज पाटलांनी 'गोकुळ'चं राजकारण एका ओळीत सांगितलं

यावेळी मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना खोतकर, दुर्गेश कठोटीवाले, किशोर पांगारकर, संजय डुकरे पाटील, निखिल पगारे, अमोल ठाकूर, विजय जाधव, दिनेश भगत, दीपक राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे जालना विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा खोतकर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com