Gokul Politics: महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? काँग्रेसच्या सतेज पाटलांनी 'गोकुळ'चं राजकारण एका ओळीत सांगितलं

Mahayuti News : महायुतीतील नेत्यांनी त्यांच्याशी बोलून गैरसमज दूर करायला पाहिजे होता. प्रशासक येणे म्हणजेच सर्वजण सामील आहेत असं माझं मत आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी 'गोकुळ'मध्ये चाललेल्या राजकारणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patilsarkaranama
Published on
Updated on

Kolhapur News: महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? महायुतीतील नेत्यांनाच हे पाहिजे होतं का असं वाटते आहे. महायुतीच्याच नेत्यांना प्रशासक पाहिजे होता का? की त्या नेत्यांचे काही चालत नाही असा प्रश्न आहे. आमदार शिवाजी पाटलांनी जी भूमिका घेतली. महायुतीतील नेत्यांनी त्यांच्याशी बोलून गैरसमज दूर करायला पाहिजे होता. प्रशासक येणे म्हणजेच सर्वजण सामील आहेत असं माझं मत आहे, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी 'गोकुळ'मध्ये चाललेल्या राजकारणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करेन, असे विधान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केले होते. त्यावर मंगळवारी(ता.5) त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

सतेज पाटील म्हणाले, गोकुळची निवडणूक पुढे जावे आणि प्रशासक यावा असे प्रयत्न केले होते. हे स्पष्ट दिसत आहे. सहकाराच्या दृष्टीने हे दुर्दैव आहे. पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. पुढील 70 ते 75 दिवसांमध्ये ठराव घेऊन बाराशे संस्थांची प्रक्रिया 90 दिवसाच्या प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्याला थांबवू शकत नाही. सरसकट सर्व 1200 संस्था चुकीच्या आहेत असं होत नाही. बाराशे संस्था या विरोधात न्याय मागतील अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच तीन संचालकांवर ईडीची कारवाई करण्याची भूमिका आहे. पण त्यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे. ज्यामुळे ते ईडीची कारवाई लावणार आहेत किंवा या संचालकांसोबत त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती. तक्रार देणारे प्रकाश बेलवडे हे भाजपचे आहेत. मग त्यांची त्यांनी समजूत का काढली नाही. हे त्यांच्या घरातलं भांडण आहे. यामध्ये महायुतीने प्रशासक गोकुळ वर लादलेला असल्याची टीकाही सतेज पाटील यांनी यावेळी केली.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Kolhapur Politic's : शिवाजी पाटलांची आता मुख्यमंत्र्यांकडे मुश्रीफांच्या राजीनाम्याची मागणी : ‘गोकुळ’वरून जिल्हा बँकेतील कर्जाचा विषय काढला बाहेर

काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला कशा पद्धतीने वागणूक मिळते हे आपण पाहत आहोत. भाजपचा अजेंडा स्वबळाचा असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच गोकुळनंतर केडीसी बँक साफ करणार आहेत असं म्हणतात. पण महायुतीने त्यांची बोलावून समजूत काढली पाहिजे. अदृश्य शक्ती कोण आहे? हे मला माहिती नाही.

मुश्रीफ यांनी सुरुवात केलेली आहे. महायुती महायुती म्हणून त्यांचा जप चालू आहे. विचाराने येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहे. कोण येतील माहिती नाही, निवडणूक कधी लागणार माहिती नाही, पण त्या त्यावेळी निर्णय घेतला जाईल.

Dhananjay Mahadik, Hasan Mushrif, Satej Patil
Mamata Banerjee news : जिव्हारी लागणाऱ्या पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या दोन महत्वाच्या घोषणा; घटनात्मक पेच निर्माण होणार का?

हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांना मान्य नाही तर मग प्रशासक येतोच कसा? यापुढे गोकुळमध्ये समविचारी लोकांना, शेतकऱ्यांना घेऊनच आम्ही पुढं लढणार आहे. भाजपने रणनीती आखली असली तरी देखील मुश्रीफांचे माहिती नाही पण माझी ताकद कमी न होता ती वाढणारच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com