Shivsena Leader Ambadas Danve News : मराठवाड्यात शेहचाळीस रुपयांचे काम दाखवा, एक लाखाचे बक्षीस घ्या..

Shiv Sena leader Ambadas Danve's challenge to Chief Minister Eknath Shinde : मागील एका वर्षात मराठवाड्यात कोणत्याही प्रकारचे एकही काम मंत्रीमंडळ बैठकीत घोषीत केल्याप्रमाणे सुरू नाही. प्रत्यक्षात कोणीही माहिती घेऊन ही बाब तपासून घ्यावी.
Ekanath  shinde, Ambadas danve
Ekanath shinde, Ambadas danveSarkarnama
Published on
Updated on

Shivsena v/s Shivsena UBT Political News : गतवर्षी संभाजीनगरात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी 46 हजार कोटी रुपयांची विकासात्मक कामांसाठी घोषणा केली होती. एका वर्षानंतर या केलेल्या घोषणांपैकी 46 रुपयांचे तरी झालेले काम दाखवा आणि एक लाख रुपयाचे बक्षीस घ्या, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात गेल्यावर्षी मराठवाड्यासाठी केलेल्या 46 हजार कोटींपैकी 29 हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे गेले असल्याचा दावा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आव्हान देत 46 रुपयांचे काम दाखवा आणि एक लाखाचे बक्षिस घ्या, असे म्हणत खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामांची यादी जाहीर करावी, असे दानवे म्हणाले.

मागील एका वर्षात मराठवाड्यात कोणत्याही प्रकारचे एकही काम मंत्रीमंडळ बैठकीत घोषीत केल्याप्रमाणे सुरू नाही. प्रत्यक्षात कोणीही माहिती घेऊन ही बाब तपासून घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात 29 हजार कोटींचे कामे सुरू असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात अशी स्थिती असेल तर राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी. मी खात्रीपूर्वक सांगतो की एकही काम पुर्ण झाले नसेल.

Ekanath  shinde, Ambadas danve
Shivsena Leader Ambadas Danve News : अंबादास दानवे म्हणतात, भाजप शिंदेंना रडवेल

मराठवाड्याला आताचे सत्ताधारी गृहीत धरत नसून गतकाळात याच क्रांतिकारी भूमीने रझाकाराला पाणी पाजले आहे. (Eknath Shinde) त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खोटी आणि फसवणूक करणारी माहिती देऊ नये, अन्यथा रझाकाराप्रमाणे आपल्यालाही आगामी काळात मराठवाड्यातील जनता पाणी पाजेल, असा इशारा अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना दिला.

तब्बल 15 हजार कोटीच्या विशेष निधीतून पश्चिम वहिनीचे पाणी वळवून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी मंजूर केले होते. वर्षपूर्ती नंतर या प्रकल्पाला राज्य सरकारकडून आतापर्यंत सर्वेक्षणासाठी फक्त 60 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. अशीच या प्रकल्पाची संथगती राहिली तर पुढील दहा वर्ष तो पूर्ण होणार नाही. राज्य सरकारची या प्रकल्प बाबत भूमिका बघता पुढील दहा वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा त्यांचा मनोदय दिसत नसल्याची टीका दानवे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com