Shivsena Political News : श्री क्षेत्र सरला बेट संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांची शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नुकतीच भेट घेतली. काही दिवसांपुर्वी एका धार्मिक कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर राज्यभरात रामगिरी महाराज यांच्याविरोधात आंदोलनाचा भडका उडाला होता. याशिवाय मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रामगिरी महाराज यांच्या विधानाच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते.
रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानबद्दल माफी मागावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी विविध ठिकाणी निदर्शने आंदोलने झाली होती. परंतु रामगिरी महाराज आपल्या विधानावर ठाम होते. शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी रामगिरी महाराज यांच्या विधानाचे समर्थन केले होते. हा वाद शमत नाही, तोच संजय शिरसाट यांनी सरला बेट संस्थान येथे जाऊन महंत रामगिरी महाराज यांची सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले.
तसेच योगीराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज समाधी मंदिरात नतमस्तक होत दर्शन घेतले. यावेळी रामगिरी महाराजांशी विविध सामाजिक, धार्मिक विषयावर संजय शिरसाट यांनी चर्चा केल्याचे समजते. (Shivsena) नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावमध्ये आयोजित सत्संग कार्यक्रमात रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त विधान केले होते. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले होते.
रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नाशिक, नगर, संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली होती. दरम्यान, रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली होती. यावरूनही मोठा राजकीय वाद झाला होता. हे प्रकरण अजून शांत झालेले नसतांना सत्ताधारी पक्षाचे आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी रामगिरी महाराजांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.