

Shiv Sena Controversy News : शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. जंजाळ यांच्या उपमहापौर पदाच्या उमेदवारीला विरोध करत माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना अर्ज भरायला लावल्याने जंजाळ चांगलेच संतापले होते. आता सभागृहातील गटनेते पदावरून दोघांमध्ये हमरीतुमरी सुरू आहे. अशातच 'राजेंद्र जजाळ या राज्याचे मुख्यमंत्री होवोत, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा', म्हणत शिरसाट यांनी त्यांना टोला लगावला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्री संजय शिरसाट यांना राजेंद्र जंजाळ यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले. जंजाळ यांनी संजय शिरसाट यांना आपल्या मुलाला उपमहापौर करायचे होते, म्हणून त्यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केल्याचा आरोप केला. या प्रश्नावर तोंडावर उसणे हसू आणत संजय शिरसाट यांनी राजेंद्र जंजाळ यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
'राजेंद्र जंजाळ यांच्यासारखे कुशल आणि सर्वगुण संपन्न असे नेतृत्व आम्हाला मिळाले आहे, हे आमचे भाग्य आहे. त्यांना जो काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो. त्यांनी आता मिळालेल्या उपमहापौर पदाचा कारभार चांगला करावा. या कार्यकाळात चागंल काम केलं तर ते भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवो, अशा माझी त्यांना शुभेच्छा, असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला.
राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट यांच्यावर आपली मुलगी हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करण्यासाठी शिरसाट यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केला, असा आरोप केला होता. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी आपली सुरूवातीपासूनची भूमिका राहिली आहे. संजय शिरसाट हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांची देखील हीच भूमिका असली पाहिजे, असे म्हटले आहे.
आता जंजाळ यांनी महापालिकेतील गटनेते पदासाठी संजय शिरसाट यांच्याकडून पुढे करण्यात आलेल्या माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या नावाला विरोध केला आहे. शिवसेनेच्या 13 पैकी 10 नगरसेवकांचा गटनेते पदासाठी त्र्यंबक तुपे यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. परंतु हा दावा जंजाळ यांना मान्य नाही. शिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकृत निरोप येत नाही तोपर्यंत गटनेते पदाचा निर्णय होणार नाही, असे जंजाळ यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.