Flight Accident : पायलटनेच बंद केला होता ‘फ्युएल स्वीच’; हा घातपातच? एअर इंडिया विमान अपघातप्रकरणी धक्कादायक माहिती समोर...

Air India Flight 171 crash : DGCA ने अद्याप आपला अधिकृत चौकशी अहवाल प्रसिध्द केलेला नाही. त्यामुळे अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी सध्यातरी कोणत्याही भूमिकेपर्यंत पोहचणे घाईचे होईल.
Air India Flight 171 crash
Air India Flight 171 crashSarkarnama
Published on
Updated on

Air India Accident Analysis : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांचे पुतणे व आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातच असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी थेट विमान कंपनीसह अनेक मुद्द्यांवर बोट ठेवत या घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी प्रामुख्याने पायलटच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली आहे. आणखी एका विमान अपघाताबाबत आता पायलटकडे बोट दाखविण्यात आले आहे.

मागील वर्षी जुलै अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातप्रकरणी पायलटवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. Corriere Della Sera या इटालियन दैनिकाने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनदरम्यान झालेल्या ताज्या चर्चेशी संबंधित दोन सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे हा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आला.

DGCA ने अद्याप आपला अधिकृत चौकशी अहवाल प्रसिध्द केलेला नाही. त्यामुळे अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी सध्यातरी कोणत्याही भूमिकेपर्यंत पोहचणे घाईचे होईल. इटालियन वृत्तपत्रानुसार, भारतीय चौकशी अधिकारी १२ जून २०२५ रोजी झालेल्या अपघातप्रकरणी अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचले असून त्यानुसार फ्युएल स्वीच बंद करण्यात आल्याने विमान अपघात झाल्याचे म्हटले आहे. हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आला होता, असे वृत्तात म्हटले आहे.

Air India Flight 171 crash
Maharashtra Government : सरकारी कार्यालयात चाललाय, मग ही बातमी वाचाच; फडणवीसांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं वाढवलं टेन्शन...

तपासामध्ये मदत करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षाला एक मोठे यश म्हटल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. दोन पायलटमधील संवादाचाही संदर्भ देण्यात आला आहे. जुलै २०२५ मध्ये भारतीय एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने जारी केलेल्या सुरूवातीच्या रिपोर्टमध्ये एका पायलटकडून फ्युएल कंट्रोल बंद करण्याबाबत शेवटच्या कॉकपीट संवादाचा हवाला देण्यात आला होता. कॉकपिट व्हाईस रेकॉर्डिंगमध्ये एका पायलटला तू (फ्युएल) का बंद केले?, असे बोलताना ऐकू येते. तर दुसऱ्याने ‘मी असे केले नाही,’ असे उत्तर दिल्याचेही ऐकू येते. 

Air India Flight 171 crash
NCP Shiv Sena Alliance : विनय कोरे यांना बालेकिल्ल्यातच धक्का; महायुतीकडून 'करेक्ट कार्यक्रम', राष्ट्रवादी-शिवसेनेने टाकला डाव...

इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, तपास करणाऱ्यांनीही आता मान्य केले आहे की, दोन पायलटांपैकी एकाने इंजिन फ्युएल कंट्रोल स्वीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे विमान बंद झाले आणि त्याचा अपघात झाला. दरम्यान, या विमानाचे पायलट इन कमांड कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर हे को पायलट होते. या अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये केवळ एक प्रवासी वाचला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com