Bandu Jadhav : खासदार संजय जाधवांच्या मनात काय? आधी घरचा आहेर; ठाकरेंची साथ सोडणार का? आता स्पष्टच बोलले

Shivsena News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणीचे खासदार बंडू जाधव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.
Bandu Jadhav News
Bandu Jadhav NewsSarkarnama
Published on
Updated on

Bandu Jadhav News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणीचे खासदार बंडू जाधव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. शिवसेनेत (Shiv Sena) पडलेल्या फुटीवरून संजय उर्फ बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. अडीच वर्षाच्या कार्यकाळात सत्तेचा लाभ झाला नाही. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पक्षसंघटनेकडे लक्ष दिले नाही. अन्य कोणाला अधिकार दिले नाही, त्यामुळे पक्षावर हा प्रसंग ओढावला, असे बंडू जाधव म्हणाले होते.

नांदेडमध्ये (Nanded) रविवारी झालेल्या शिवगर्जना कार्यक्रमात जाधव बोलत होते. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठे विधान केले आहे. ''ज्या दिवशी पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू तेव्हा रक्तात दोष आहे, असे गृहीत धरा. कारण, ज्या पक्षाने आपल्याला वाढवले, त्याच्याशी पाईक राहणे आपले कर्तव्य असल्याचे'' जाधव यांनी म्हटले आहे.

Bandu Jadhav News
Pune News : कसब्याने पुण्यातील राजकीय गणित बदलणार; खडकवासल्यात तापकीरांचे टेन्शन वाढणार...

एका कार्यक्रमात बोलताना जाधव म्हणाले की, ''अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मार्केट कमिटी, आमदार, खासदार या पदांवर काम करण्याचे भाग्य मिळाले आहे. हा जन्म काय, सात जन्म पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही, एवढे दिले. पन्नास खोके काय, शंभर खोके आले तरी माझ्या उंचीसमोर खूप ठेंगणे वाटतात, असे जाधव म्हणाले.

''पैसे कधीही कामी येणार नाही. हे काही घेऊन जाणार आहेत का? ज्या दिवशी पक्षाशी विद्रोह करू, बेईमानी करू, तेव्हा आमच्या रक्तात दोष असल्याचे गृहीत धरा. ज्या पक्षाने आपल्याला वाढवले. त्याच्याशी पाईक राहणे आमचे कर्तव्य असल्याचे जाधव म्हणाले.

Bandu Jadhav News
Ashok Chavan News : 'अशोक चव्हाणांना एवढी कशाची भीती वाटतेय...? त्यांची ED, CBIकडे तक्रार झालीय का?'

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले होते. ''तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते, तर मग पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हते. पोराला मंत्री व्हायचे होते, तर तुम्ही मुख्यमंत्री पद घ्ययला नको होते. त्यामुळे त्यांनी वेगळी चुल मांडली, तर काय बिघडले. याच भूमिकेतून ही गद्दारी झाली, असे जाधव म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com