Ashok Chavan News : 'अशोक चव्हाणांना एवढी कशाची भीती वाटतेय...? त्यांची ED, CBIकडे तक्रार झालीय का?'

त्यांना हे आजच का बोलावं लागलं. ईडी, सीबीआयकडे त्यांच्याबद्दल काही तक्रारी तर झाल्या नाहीत ना, हेही बघावे लागेल.
Ashok Chavan : Chandrashekhar Bawankule
Ashok Chavan : Chandrashekhar BawankuleSarkarnama

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कशीतरी भीती वाटत असेल. आताच का त्यांना भीती वाटतेय. त्यांना हे आजच का बोलावं लागलं. ईडी , सीबीआयकडे त्यांच्याबद्दल काही तक्रारी तर झाल्या नाहीत ना, हेही बघावे लागेल, खोचक टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मंत्री अशोक चव्हाणांना लगावला. (What is Ashok Chavan afraid of : Chandrashekhar Bawankule)

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआयच्या चौकशा मागे लागतात, असे विधान माजी मुख्यमंत्री तथा आमदार अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चव्हाणांवर निशाणा साधला.

Ashok Chavan : Chandrashekhar Bawankule
Jadhav Vs Kadam : ‘एहेसान फरामोश’ भास्कर जाधवांनी त्यावेळी मला साष्टांग दंडवत घातला होता : रामदास कदमांचा पलटवार

बावनकुळे म्हणाले की, या देशात ईडी, सीबीआय, आणीबाणी यांचा वापर करण्याची काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे. देशात ज्या ज्या वेळी काँग्रेसचे सरकार होते, त्या त्या वेळी त्यांनी जाणीवपूर्वक चौकशा लावल्या होत्या. त्यांची संस्कृती आणि संस्कार असल्यामुळे ते या संस्थांचा वापर करत होते. पण, मोदी सरकारच्या काळात कधीही या संस्थांचा गैरवापर झालेला नाही. कधीही ईडी आणि सीबीआयचा चुकीचा वापर झालेला नाही.

Ashok Chavan : Chandrashekhar Bawankule
Ramdas Kadam : 'कदमांना संपविण्यासाठी ‘मातोश्री’त शिजलेली कटकारस्थाने उदय सामंत १९ तारखेला उघड करणार'

ईडी, सीबीआयकडे ज्या तक्रारी जातात, त्या तक्रारींच्या आधारे ते कारवाई करतात. त्या तक्रारीनुसार कोणाचीही चौकशी होऊ शकते. उद्या माझीही चौकशी होऊ शकते. पण, अशोक चव्हाण यांना आताच एवढी भीती का वाटतेय. अशोक चव्हाण यांची काय तक्रार ईडी, सीबीआयकडे झालेली आहे का; म्हणून ते अगोदरच हे सर्व सांगत आहेत, असेही ते म्हणाले.

Ashok Chavan : Chandrashekhar Bawankule
Thackeray Vs Kadam : उद्धव ठाकरेंनी ‘ते’ सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन : रामदास कदमांचे आव्हान

विरोधी पक्षातील नेत्यांचं ठरलंय उद्या काय गडबड होणार असेल तर अगोदरच सांगून टाकतात. माझ्याविरोधात असं होणार आहे, म्हणून. मला वाटतंय, आमदार अशोक चव्हाण यांच्या विरोधात काही तक्रारी झालेल्या असतील, त्यामुळे त्यांनी घाबरून हे बोलणे सुरू केलेले दिसत आहे, असा टोमणाही बावनकुळे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com