औरंगाबाद : भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, महाविकास आघाडी खंबीर आहे त्यासाठी एमआयएमची गरज नाही. (Amim) एमआयएम आणि हिंदुत्व एकत्र जोडणे अशक्य असून. एमआयएमचा बोलवताधनी भाजप असून एमआयएमने खुशाल त्यांचे बटीक व्हावे. (Shivsena) भाजपचे महाविकास आघाडी अस्थिर करण्याचे मनसुबे यशस्वी कदापी होऊ दिले जाणार नाहीत, असा असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिला.
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्याने खासदार राऊत मंगळवारी (ता.२२) औरंगाबादेत आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना राऊत यांनी मुंबई येथील हज हाऊसमध्ये दोन वर्षांपुर्वी आयोजित इफ्तार पार्टीत डोक्यावर गोल टोपी घालून देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्याचे फोटो सादर केले. याच फोटोचा संदर्भ देत राऊत म्हणाले, फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब, असा केला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.
देशातील तमाम नागरिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुऱ्हदयसम्राट ही पदवी दिली आहे. ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी ते स्वीकारले आणि भाजपची भरभराट झाली. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची व्यापक व्याख्या केली, त्याला न्यायालयाने देखील मान्यता दिल.असे असताना फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख जनाब असा करावा, ही बाब अक्षम्य आहे. आम्ही त्याचा धिक्कार करतो, सर्वांनीच त्याचा धिक्कार केला आहे.
मतांच्या लाचारीसाठी शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडले नसल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत फुट पाडून त्रास देण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. संभ्रम निर्माण व्हावा म्हणून भाजपने कपट नितीचा कळस गाठल्याच आरोप करून राऊत यांनी एमआयएमला लक्ष केले. एमआयएमला भाजपची बटिक म्हणून रहायचे असेल तर त्यांनी खुशाल तसे रहावे. एमआयएम व हिंदुत्व एकत्र जोडणे शक्य नाही.
भाजपच्या सांगण्यावरुन शिवसेनेच्या वाट्याला एमआयएम हा पक्ष आल्यास ते सहन केले जाणार नाही. एमआयएमचा बोलवताधनी भाजप असून भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असे राऊत म्हणाले. दिल्लीपासून गावापर्यंतच्या भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना शिवसेनेबद्दल आकर्षण आहे, शिवसेनाप्रमुखांबद्दल आदर असल्याचे त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.