घराघरावर भगवा संकल्पनेतून शिवसेनेचे `मिशन महापालिका`

(Aurangabad Shivsena Celebrate Saffron Diwali)महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्रित लढवण्याची शक्यता असली तरी महापौर शिवसेनेचाच असेल असा दावा नेत्यांकडून केला जातोय.
Aurangabad Shivsena
Aurangabad ShivsenaSarkarnama

औरंगाबाद ः शिवसेनेच्या वतीने यंदा भगवी दिवाळी साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. हजारो घरांवर किमान ५० हजार भगवे ध्वज लावून ही दिवाळी भगवी दिवाळी म्हणून साजरी केली जाणार आहे. या मोहिमेला आजपासून सुरूवात झाली आहे. घराघरावर भगवा या संकल्पनेच्या माध्ममातून शिवसेनेने मिशन महापालिका अभियान सुरू केले आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना-भाजप या दोन पारंपारिक मित्रांमध्ये वितुष्ट आले आहे. तर ज्यांच्या विरोधात लढत राज्यात आणि महापालिकेत वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली त्याच काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ शिवसेनेवर विधानसभा निवडणुकीनंतर आली. आता राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत तर भाजप विरोधी पक्षात आहे. याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था ते आगामी विधानसभा निवडणुकीत देखील होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीची तयारी शिवसेनेसह आघाडीतील काॅंग्रेस-राष्ट्रवादीनेही सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरू शकणारे नियमित पाणीपुरवठा, गुंठेवारी भाग आणि कचरा, रस्ते हे प्रश्न राज्यात सत्ता आल्यानंतर मार्गी लावण्याचे वेगवान प्रयत्न झाले.

१६८० कोटींची पाणीपुरवठा योजना, कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आणि गुंठेवारीसाठी मुदतवाढ असे निर्णय घेत शिवसेनेने या मुद्यांना हात घातला आहे. महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्रित लढवण्याची शक्यता असली तरी महापौर शिवसेनेचाच असेल असा दावा नेत्यांकडून केला जातोय. त्यादृष्टीनेच शिवसेनेने वाटचाल सुरू केली आहे.

संभाजीनगर हा शिवसेनेचा हक्काचा मुद्दा याही निवडणुकीत गाजणार हे स्पष्ट आहे. हिंदुत्वातील वाटेकरी असलेली भाजप आता स्वतंत्र लढणार असल्याने आपलेच हिंदुत्व कसे कट्टर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेने ५० हजार भगवे ध्वज लावण्याच्या संकल्पातून केले आहेत. मिशन महापालिकेच्या अभियानाची सुरूवात करण्यासाठी शिवसेनेने दिवाळीचा मुहूर्त साधला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Aurangabad Shivsena
ओवेसींची पाठ फिरताच `एमआयएम`मध्ये फुटीची चर्चा

घराघराव भगवा लावून महापालिकेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनेचे स्वप्न सत्यात उतरणार का? हे आगामी काळात दिसेल. शहरातील अमरप्रीत चौकातून ५० हजार भगवे ध्वज लावण्याच्या संकल्पनेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करून ध्वज दिवाळी अभियानाची धुमधडाक्यात सुरुवात करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com