Hingoli Lok Sabha 2024: हेमंत पाटलांच्या उमेदवारीवरून महायुतीत वाद, विजयासाठी संघर्ष अटळ..

Shivaji Mane on Hemant Patil: हेमंत पाटील पाच वर्षात कधी जनतेत मिसळले नाही. केवळ पक्षाच्या प्रमुखाशी चांगले संबंध ठेवून उमेदवारी आणली म्हणजे तुम्हाला लोक निवडून देतील हा भ्रम आहे.
Hingoli Lok Sabha 2024
Hingoli Lok Sabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli: शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील एकमेव हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha 2024) मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. या उमेदवारीनंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर उमटतांना दिसतो आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता आणि जनतेच्या मनात काय आहे? याचा अंदाज न घेता हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या सीट पडली तर आम्हाला जबाबदार धरू नका, असा इशाराच भाजपचे जिल्ह्यातील नेते माजी खासदार शिवाजी माने (Shivaji Mane) यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून मला मत द्या, असं जर तुम्ही म्हणत असाल तर लोकही आम्हाला योग्य उमेदवार द्या, असं म्हणणारच असा सूर माने यांनी लावला आहे. दुसरीकडे भाजपकडून लोकसभा लढवण्यास इच्छूक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांच्यावर तुम्ही अपक्ष लढा, असा दबाव त्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून आणला जात आहे. एकीकडे माजी खासदार शिवाजी माने यांनी महायुती असली तरी उमेदवार योग्य नसल्याने दगाफटका होऊ शकतो, असा इशारा दिला आहे,

तर दुसरीकडे सुमठाणकर समर्थक बंडाच्या पावित्र्यात आहेत. अशा परिस्थितीत आधी उमेदवारीसाठी संघर्ष कराव्या लागलेल्या हेमंत पाटील यांना आता विजयासाठी संघर्ष करावा लागणार असे दिसते. हेमंत पाटील यांची उमेदवारी कापली जाणार, अशी चर्चा जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून होती. परंतु प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाच्यावेळी सोबत आलेल्या सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारीचा शब्द भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून मिळवला होता.

इच्छूकांच्या आशेवर मात्र पाणी फिरले...

शिंदे गटाचे खासदार असलेल्याही मतदारसंघात जेव्हा भाजपकडून दावे केले जाऊ लागले, तेव्हा मात्र मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपने सर्वप्रथम आपल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर आणि नांदेड या पुर्वीच्या जागांवर उमेदवार जाहीर झाले. शिवसेना शिंदे गटाने दावा केलेल्या अनेक मतदारसंघावरून वाद असल्याने त्यांची यादी बरीच रखडली.

दोन दिवसांपुर्वी राज्यातील आठ उमेदवार शिंदे गटाकडून जाहीर झाले, त्यात मराठवाड्यातील हिंगोली या एकमेव जागेचा समावेश होता. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला, पण दावेदारी सांगणाऱ्या भाजपमधील इच्छूकांच्या आशेवर मात्र पाणी फिरले. याचे पडसाद हळूहळू उमटायला लागले असून शिवाजी माने यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Hingoli Lok Sabha 2024
Nilesh Lanke News: नीलेश लंकेंनी घेतली मध्यरात्री बाळासाहेब थोरातांची भेट; दीड तास खलबतं...

पक्षाच्या कार्यकर्त्याला भावच नाही...

हेमंत पाटील हे जनतेशी लॉयल नसलेले उमेदवार आहेत, त्यामुळे लोक महायुती असली आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असले तरी स्वीकारणार नाहीत, अशा इशारा दिला आहे. तिसऱ्या आघाडीने सक्षम पर्याय दिला, तर जनता त्यांचाही विचार करू शकते, असेही माने यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. देशात जसं शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, तसंच आता राजकारणात झालं आहे, पक्षाच्या कार्यकर्त्याला भावच राहिलेला नाही, अशी उद्विगनताही माने यांनी बोलून दाखवली.

निवडून देतील हा भ्रम ...

हेमंत पाटील पाच वर्षात कधी जनतेत मिसळले नाही, लोकांची त्यांनी कामे केली नाही, केवळ पक्षाच्या प्रमुखाशी चांगले संबंध ठेवून उमेदवारी आणली म्हणजे तुम्हाला लोक निवडून देतील हा भ्रम आहे. राज्यात महायुती असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिंगोली लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करतांना केवळ भाजपच नाही, तर युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीशीही चर्चा करायला हवी होती, अशी नाराजीही व्यक्त केली. महायुती म्हणून आम्ही लोकांकडे मतं मागायला जावूही, पण लोकांनी उमेदवारच नाकारला तर आमचा नाईलाज असेल, असा इशारा देतांनाच अजूनही वेळ गेलेले नाही. पक्षाने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी मागणीही माने यांनी केली.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com