Shivsena : अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा या परस्पर विरोधी गोष्टी..

या सरकारमध्ये सर्वात वाचाळ मंत्री कोण असतील तर ते सत्तार आहेत. त्यांच्या आजच्या वक्तव्याचा करावा तेवढा निषेध थोडाच असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. (Opposition Leader Ambadas Danve)
Ambadas Danve-Abdul Sattar News, Aurangabad
Ambadas Danve-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा या परस्पर विरोधी गोष्टी आहेत, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. सिल्लोडमध्ये बोलतांना सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.

Ambadas Danve-Abdul Sattar News, Aurangabad
Ncp : सत्तारांच्या विधानावर सुप्रिया शांत, पती सुळेंनी मात्र व्यक्त केले मत; स्त्री द्वेष्टे पुढारी..

यावर अकोला दौऱ्यावर असणाऱ्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता अंबादास दानवे यांनी देखील सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी सोशल मिडियावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सत्तार हे मंत्रीमंडळातील सर्वात वाचळवीर मंत्री असल्याचे म्हटले आहे. (Shivsena)

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. या सरकारमध्ये सर्वात वाचाळ मंत्री कोण असतील तर ते सत्तार आहेत. त्यांच्या आजच्या वक्तव्याचा करावा तेवढा निषेध थोडाच असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत. सिल्लोड या आपल्या मतदारसंघात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषा वापरली.

त्यानंतर एकच खळबळ उडाली असून सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमक होतांना दिसत आहे. राज्यातील सत्तातंरानंतर शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर सातत्याने ५० खोके घेतल्याचा आरोप होत आहे. यावरून विरोधक शिंदे व त्यांच्या समर्थकांवर तुटून पडले आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपुर्वी असाच आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केल्याचे बोलले जाते.

त्यावर सत्तार यांनी तुम्हाला काही खोके पाहिजे का? असा पलटवार केला होता. त्याला प्रत्युत्तर देतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, की तुम्हाला मिळाले असतील म्हणूनच तुम्ही आॅफर करतायं. या संदर्भात सिल्लोडमध्ये एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सत्तार यांना विचारले असता, सत्तारांनी पातळी सोडत सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com