Ambads Danve Reaction On MNS-Uddhav Thackaery News
Ambads Danve Reaction On MNS-Uddhav Thackaery NewsSarkarnama

Ambadas Danve : अंबादास दानवे म्हणतात, मनसे सोबतच्या युतीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील; आमची स्वतंत्र तयारी!

Ambads Danve On MNS Reaction : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणचिन्ह या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला आहे यावर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी काहीसा नाराजीचा सूर काढला
Published on
Summary
  1. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले की, मराठवाड्यात मनसेसोबत युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

  2. दानवे म्हणाले की, पक्षाची स्वतंत्र तयारी सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि कार्यकर्त्यांना लढाईसाठी सज्ज करण्यात येत आहे.

  3. या वक्तव्यामुळे मराठवाड्यातील आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Shivsena UBT News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसात वारंवार भेटी आणि गुप्त बैठका झाल्या. राज ठाकरे मातोश्रीवरही येऊन गेले. कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत राजकीय चर्चा आणि युती संदर्भात अंतिम बोलाचाली झाल्याचेही समजते. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत मनसेच्या युतीची बोलणी अंतिम झाली असल्याचीही चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना (Shivsena) मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना जेव्हा विचारला, तेव्हा त्यांनी सध्या आमची स्वतंत्र तयारी सुरू आहे. मनसे सोबतच्या युती संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय स्थानिक पातळीवर झालेला नाही.

मनसे सोबतच्या युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील. आम्ही संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने स्वतंत्र तयारी मात्र सुरू केली आहे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने निर्णय घेतील आणि आदेश देतील त्या पद्धतीने मी पुढे जाऊ, असेही अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी स्पष्ट केले.

Ambads Danve Reaction On MNS-Uddhav Thackaery News
Ambadas Danve News : महायुतीच्या तीन जादूगारांची हातचलाखी; अंबादास दानवेंकडून पॅकेजचे पोस्टमार्टम

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणचिन्ह या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला आहे. यावर भाष्य करताना अंबादास दानवे यांनी काहीसा नाराजीचा सूर काढला. न्यायालयाच्या निर्णयावर काही बोलता येत नाही. परंतु आपल्याकडे कुत्रे, कबुतरे यांच्यासाठी वेळ आहे, मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह विषयीचा निर्णय मात्र होत नाही, अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमचीच आहे आमचाच पक्ष ओरिजनल शिवसेना असल्याचा दावा करताना निश्चितच आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेनेचा शेतकऱ्यांना सोबत घेऊन हंबरडा मोर्चा निघणार आहे. यातून आम्ही सरकारला कर्जमुक्तीचा निर्णय घ्यायला भाग पाडू असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.

FAQs

1. प्रश्न: अंबादास दानवे यांनी मनसेसोबत युतीबाबत काय म्हटले?
उत्तर: त्यांनी सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि शिवसेना स्वतंत्रपणे तयारी करत आहे.

2. प्रश्न: ही चर्चा कोणत्या भागात संबंधित आहे?
उत्तर: ही चर्चा मराठवाडा आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगर विभागाशी संबंधित आहे.

3. प्रश्न: शिवसेना आणि मनसेमध्ये चर्चेची शक्यता आहे का?
उत्तर: सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नाही, पण राजकीय पातळीवर तर्कवितर्क सुरू आहेत.

4. प्रश्न: शिवसेनेची निवडणुकीसाठी तयारी कशी सुरू आहे?
उत्तर: पक्ष कार्यकर्त्यांना जिल्हास्तरावर मजबूत नेटवर्क उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

5. प्रश्न: या वक्तव्यामुळे कोणत्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत?
उत्तर: मराठवाड्यातील आगामी निवडणुकीतील युतींच्या शक्यतांवर नव्याने चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com