औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला; शिवसेना, भाजप, मनसे आमनेसामने

Aurangabad water politics औरंगाबाद शहरात पाणीप्रश्नावरून बॅनर लावत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
Aurangabad water politics
Aurangabad water politics
Published on
Updated on

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये पाण्यावरून राजकारण तापलं आहे. या पाणी युद्धात आता शिवसेना, भाजप, मनसे यांनीही उडी घेतली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे असतानाच आता शिवसेना-भाजपमध्ये पाण्यासाठी बॅनरबाजी सुरु झाली आहे. औरंगाबाद शहरात पाणीप्रश्नावरून बॅनर लावत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

औरंगाबाद करांच्या पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप मोर्चा काढणार आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात भाजपकडून बॅनर लावण्यात आलेत. तर भाजपच्या या बॅनरबाजीला शिवसेनेनं बॅनर लावून प्रत्युत्तर दिलं आहे.

Aurangabad water politics
राजनाथ सिंहांनी दिले गडकरींच्या नातवाला आशीर्वाद

औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरून भाजपने येत्या सोमवारी ४ वाजता जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. तर शिवसेनेनं भाजपच्या या बॅनरला प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही पाणीपट्टी पन्नास टक्क्यांवर आणली. तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यांवर आणणार का ?, अशा आशयाचा बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आला आहे. यामुळे भाजप-शिवसेनेमध्ये बॅनरयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीदेखील औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरून भाजप-शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली होती. "निवडणुका आल्या की यांना औंरगाबादच्या पाणीप्रश्नाची, संभाजीनगर, औरंगजेबाची आठवण यांना कशी येते, अस सवाल करत त्यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला होता. तर, पाच वर्षे शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत असताना तुम्ही काय केले ? भाजप शिवसेनेसोबत सत्तेत होता, त्यांचाही महापौर होता, तेव्हा फडणवीसांनी काय केलं ?, असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस शिवसेना आणि खासदार जलील यांच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com