Gangapur Sugar Factory : गंगापूर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होवून तिथे सत्ता परिवर्तनही झाले. आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलचा पराभव करत कृष्णा पाटील डोणगांवकर (Krishna Patil Dongaonkar) यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही पॅनलने एकहाती विजय मिळवला. मात्र या विजयानंतर आमदार बंब आणि डोणगांवकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे.
बंब यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका केल्याने महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते आक्रमक झाले आहेत. (Shivsena) दसऱ्याला कारखाना सुरू होण्याची आणि दिवाळीला वाटप होणाऱ्या साखरेच्या बोनसची मी वाट पाहतोय, असे आव्हान बंब (Prashant Bamb) यांनी नव्या संचालक मंडळाला आपल्या प्रतिक्रेयत दिले होते. त्याला देखील शिवशाही पॅनलचे कृष्णापाटील डोणगांवकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गंगापूर साखर कारखाना आम्ही २०२३ च्या दसऱ्यालाच सुरू करणार आणि त्याच कारखान्यातून उत्पादित केलेल्या साखरेने तुमची तुला करू, असा दावा डोणगांवकर यांनी केला. कारखाना सुरू करण्यात तुम्ही कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडू, असेही ते म्हणाले. गंगापूर कारखाना निवडणुकीतून आमदार बंब यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना हद्दपार करण्यात शिवसेनेला यश मिळाले.
बंबसाठी जेवढा हा पराभव धक्कादायक ठरला तेवढाच तो शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला आगामी विधानसभेच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. परंतु कारखान्याच्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. बंब यांनी आपल्या पराभावाचे खापर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या अनुयायांवर फोडले. सहकार क्षेत्र पवारांनी लुटून खाल्ले, भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असा आरोप देखील बंब यांनी केला होता.
त्याला देखील डोणगांवकर यांनी उत्तर दिले. सहकार क्षेत्र जर आज कुणामुळे जिवंत असेल तर ते शरद पवार यांच्यामुळे. तुमच्या पक्षातील नितिन गडकरी, रावसाहेब दानवे जे सहकार क्षेत्रात काम करतात, त्यांना एकदा विचार, असा टोला देखील डोणगांवकरांनी लगावला. गंगापूरचा कारखाना तुम्ही ११ वर्ष सत्तेत असून देखील तुम्हाला सुरू करता आला नाही.
उलट तुमचा काळा पैसा या कारखान्यात लावून तुम्ही स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधीही कारखान्याच्या हिताच्या आड आलो नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियत अडकवले हा तुमचा आरोप देखील बिनबुडाचा असल्याचे डोणगांवकर यांनी व्हिडिओच्या माध्यामातून स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.