औरंगाबाद : राज्यसभेतील सहाव्या जागेसाठी शिवसनेकडून कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कट्टर आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. (Shivsena) संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची शिवबंधन बांधण्याची मागणी धुडकावल्यानंतर आता कोण ? अशी चर्चा सुरू असतांना मराठवाड्यातील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे नाव मिलिंद नार्वेकर, उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत आघाडीवर होते. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना कट्टर शिवसैनिकालाच उमदेवारी देणार अस का म्हणाले होते, हे संजय पवार यांच्या उमेदवारी नंतर स्पष्ट झाले.
तसे चंद्रकांत खैरे हे देखील कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंच्या पठडीत तयार झालेले, मातोश्रीशी एकनिष्ठ. पण नव्या चेहऱ्याला संधी म्हणून संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि इकडे प्रसार माध्यमांनी खैरेंकडे आपला मोर्चा वळवला. (Aurangabad) गेल्यावेळी राज्यसभेसाठी लोकसभेला पराभूत झालेल्या खैरेंचे नाव चर्चेत होते. खैरैंना देखील आपले पुनर्वसन केले जाईल असा विश्वास असतांना, अचानक उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे यांनी काॅंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली.
त्यावेळी मात्र खैरेंचा संयम ढळला होता. आदित्यजी उद्धवजींना आमचे काम आवडले नसले, अशा शब्दांत खैरे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेतील ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासात पहिल्यांदा खैरे यांनी उघडपणे ठाकरे कुटंबातील सदस्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. आपण रागाच्या भरात बोलून गेलो असे म्हणत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. पण त्यांच्या या विधानाचा आणि नाराजीचा चांगलाच फटका खैरेंना बसला होता. जवळपास एक वर्ष उद्धव ठाकरे, आदित्य यांनी खैरेंशी संभाषण केले नव्हते असे देखील सांगितले जाते.
परंतु झालेली चूक सुधारत खैरे यांनी पुन्हा मातोश्रीशी जुळवून घेतले आणि ठाकरे कुटुंबाचा विश्वास संपादन केला. पुन्हा राज्यसभेची संधी आणि नाव चर्चेत असतांना कोल्हापूरच्या संजय पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. यावर खैरे यांनी प्रसार माध्यमांना अगदी संयमित प्रतिक्रिया दिली. संजय पवार हे देखील कट्टर शिवसैनिक आहे, त्यांना उमेदवारी मिळाल्याचा मला आनंदच आहे, पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अभिमान देखील वाटत असल्याचे म्हटले.
शिवाय लोक अजूनही आपल्यालाच खासदार समजतात. सगळ्यांपेक्षा आपण अजूनही लोकांची कामे करण्यात अग्रेसर आहोत,असा दावा देखील खैरे यांनी केला. एकंदरित संधी हुकल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त करून पुन्हा ठाकरेंचा रोष ओढावून घेण्याची चूक खैरेंनी केले नाही, असेच या निमित्ताने म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.