Eknath Shinde : सहा पैकी पाच आमदार फोडले, तरी शिंदे म्हणतात आणखी साफसफाई करायचीयं..

Shivsena : शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात उद्धव सेनेकडे फक्त दोन आमदार आहेत.
Cm Eknath shinde News, Aurangabad
Cm Eknath shinde News, AurangabadSarkarnama

Aurangabad Political : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात त्यांच्या शब्दात उठावत जिल्ह्यातील ६ पैकी ५ आमदार सहभागी झाले होते. (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. राज्यातील सत्तातंरानंतर उरली-सुरली शिवसेना देखील संपवायची असा उद्देश शिंदे सेनेचा दिसतोय. आज औरंगाबादेतील महास्वच्छता अभियानाला शुभेच्छा देण्यासाठी शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतच दिले.

Cm Eknath shinde News, Aurangabad
Raosaheb Danve : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला तोंडावर आपटले

विमानतळावर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा, नम्रपणे हात जोडत आज फक्त स्वछता मोहिम, संभाजीनगरची साफसफाई करायची आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला. (Shivsena) उद्धवसेनेच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला देखील त्यांनी जास्त महत्व न देता त्यांचा हा फक्त केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगितले.

नागपूर न्यासाच्या भूखंड प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे (Ekhath Shinde) यांचा राजीनामा महाविकास आघाडी आणि उद्धवसेनेकडून हिवाळी अधिवेशनात केला जातोय. मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालू असतांनाचा आता मुंबईतील बिल्डर सुरज परमार यांच्या मृत्यू प्रकरणात `इएस` कोण आहे? याची देखील चौकशी केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

या कोडवर्ड वरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपात मुख्यमंत्री शिंदे यांनी औरंगाबाद केलेले विधान सूचक म्हणावे लागेल. अख्खी शिवसेना फोडल्यानंतर देखील एकनाथ शिंदे उरलेल्या पदाधिकारी, आमदारांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदेंच्या बंडाला औरंगाबाद जिल्ह्याने भक्कम साथ दिली होती. शिवसेनेच्या ६ पैकी ५ आमदरांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने हा मोठा धक्का होता.

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात उद्धव सेनेकडे फक्त दोन आमदार शिल्लक राहिले आहेत. पैकी एक विधान परिषदेचे आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुका पाहता उद्धवसेनेला आणखी धक्के देण्याचा शिंदेसेनेचा प्रयत्न असणार आहे. संभाजीनगरात आणखी साफसफाई करायची आहे, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

Cm Eknath shinde News, Aurangabad
Arjun Khotkar : गोरंट्याल म्हणजे गटार गंगा, आता त्यांची प्रकरणं बाहेर काढतो..

शिंदे सेनेने ठाकरे गट फोडण्याचे मध्यंतरी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना फारसे यश आले नव्हते. तर आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील जे पदाधिकारी शिंदेसेनेत गेले होते, ते चोवीस तासात उद्धवसेनेत परतल्याने शिंदेगटाची नाचक्की झाली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या साफसफाईचे आदेश स्थानिक नेते, पदाधिकारी किती मनावर घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com