Shivsena : बंडाळीनंतरच्या डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेनेचे संपर्कनेते औरंगाबादेत..

विनोद घोसाळकर हे शहरात आले असून ते पैठण, सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेऊन शिवसैनिकांचे मनोबल वाढवणार आहेत. (Aurangabad)
Shivsena News, Aurangabad News, Maharashtra Political Crisis
Shivsena News, Aurangabad News, Maharashtra Political CrisisSarkarnama

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मराठवाडा विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातून चांगलेच बळ मिळाले. जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदार या बंडात सहभागी झाले आहे. (Aurangabad) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने ढासळलेला शिवसेनेचा बालेकिल्ला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मजबुत झाला. (Shivsena) राज्यात सत्ता आली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण याचा राजकीय लाभ संघटना मजबुत आणि अधिक विस्तार करण्यात शिवसेनेला करून घेता आला नाही हेच या बंडळीतून स्पष्ट झाले आहे. (Aurangabad Latest Marathi News)

ज्या शिवसेनेमुळे भुमरे पाचवेळा, शिरसाट तीनवेळा तर बंडखोरी करूनही जैस्वाल दोनदा विधानसभेवर निवडून गेले, त्याच स्वतःला कट्टर म्हणवणाऱ्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. ... आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणणारे त्यांचे समर्थक देखील या बंडाने व्यथित झाले आहेत. (Marathwada) ज्यांचे आर्थिक व्यवहार, कंत्राटदारीमधील सहभागी आहे ते व त्यांचे इतर बगलबच्चेच या बंडखोरांच्या समर्थनार्थ रॅली आणि पोस्टरबाजी करून शक्ती प्रदर्शन करतांना दिसत आहेत. (Maharashtra Political Crisis)

पैठण, सिल्लोड मध्ये भुमरे, सत्तार समर्थकांची गर्दी पाहता इतकी वर्ष राजकारणात असूनही त्यांना वैयक्तिक किती लोकांचा पाठिंबा आहे हे उघड झाले. शिवसेना या चार अक्षरांमुळेच आपल्याला किंमत आहे हे जिल्ह्यातील बंडखोरांना आता समजले असेल. कॅबिनेट मंत्री भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे शक्ती प्रदर्शन म्हणजे फुसका बार ठरला. तर जैस्वाल, शिरसाट, बोरनारे यांच्यासाठी त्यांच्या समर्थकांचे समर्थन हे बॅनरबाजी पुरतेच मर्यादित होते.

आता या बंडखोरांना सामान्यांचा पाठिंबा नाही हे लक्षात आल्यावर मुंबईतील संपर्कनेते औरंगाबादेत दाखल झाले आहेत. बंडखोरांमुळे जे काही थोड्याफार प्रमाणात डॅमेज होण्याची शक्यता आहे ते रोखण्याचा आणि बंढकोरांच्या विरोधातील रोष अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.

Shivsena News, Aurangabad News, Maharashtra Political Crisis
सचिन आहिरांचा बंडखोरांना इशारा ; फ्लोअर टेस्ट आधी रोड टेस्ट द्यावी लागेल

औरंगाबादचे संपर्कनेते विनोद घोसाळकर हे शहरात आले असून ते पैठण, सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांचे मनोबल वाढवणार आहेत. आता त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येते हे लवकरच दिसून येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com