Shivsena : राष्ट्रवादी-काॅंग्रेसमुळे होणारे नुकसान उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही ..

आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सोबत राहायचं नाही, त्यांची वर्तणूक ही चांगली नाही. या दोन्ही पक्षांमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. (Mla Sanjay Sirsath)
Mla Sanjay Sirsat News, Aurangabad News, Maharashtra Political Crisis News,  Shivsena News
Mla Sanjay Sirsat News, Aurangabad News, Maharashtra Political Crisis News, Shivsena NewsSarkarnama

औरंगाबाद : आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना पुढे घेऊन जात शिवसेनेचे (Shivsena) हिंदुत्व मांडत आहोत. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत राहायचं नाही, त्यांची वर्तणूक आम्हाला पसंत नाही त्यामुळे आम्ही स्वखुशीने एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट (Ncp) यांनी दिली. (Maharashtra Political Crisis News)

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मराठवाडा आणि विशेषतः (Aurangabad) औरंगाबादेतून चांगलेच बळ मिळाले आहे. जिल्ह्यातील सात पैकी पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि तिथून गुवाहाटीत आहेत. यापैकीच एक म्हणजे पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. तीन टर्म आमदार असलेले संजय शिरसाट हे शिंदे यांच्या सर्वाधिक जवळचे मानले जातात.

शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघाता निधी देतांना शिंदे यांनी कधी हात आखडता घेतला नाही. शिरसाटांनी प्रस्ताव घेऊन जावा आणि शिंदेनी तथास्तू म्हणावे, एवढा निधी त्यांनी मतदारसंघात आणला. एकनाथ शिंदे यांच्यावर माझे प्रेम आहे, अस शिरसाट जाहीरपणे सांगायचे. त्याच प्रेमाची परतफेडच शिरसाट यांनी शिंदेसोबतच्या बंडात सामील होत केली आहे.

दोन दिवसांपासून नाॅटरिचेबल असलेले ऐकऐक आमदार आता प्रसार माध्यामासमोर प्रकट होत आहेत. संजय शिरसाट यांनी देखील आपण शिंदे यांच्यासोबत का आहोत ? याचा खुलासा केला आहे. शिरसाट म्हणाले,आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व मांडत आहोत, आम्ही त्यांचे पाईक आहोत. आम्हाला जे आज काही मिळालं ते शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळेच व त्यांचेच विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, हीच आमची भूमिका आहे.

Mla Sanjay Sirsat News, Aurangabad News, Maharashtra Political Crisis News,  Shivsena News
Shivsena : स्लीप बाॅय ते पाचवेळा आमदार अन् कॅबिनेट मंत्रीपद, तरी भुमरेंनी गद्दारी का केली ?

शहर गट-तट हे राजकारण आम्ही करत नाही, आम्ही हिंदुत्वाचे राजकारण करतो. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सोबत राहायचं नाही, त्यांची वर्तणूक ही चांगली नाही. या दोन्ही पक्षांमुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. ते आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आलो, शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला लढायला सांगितले होते, ते या पद्धतीने नाही.

त्यामुळेच नाराज आमदारांनी शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आमदारांच्या प्रत्येक मतदार संघात प्रतिस्पर्ध्यांना वाव दिला जात असल्यामुळे शिवसैनिकांची गळचेपी होत आहे. सर्वाधिक त्रास हा राष्ट्रवादीने दिला असल्याचा आरोप देखील शिरसाट यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com