Shivsnea : आमचं बोट पकडून मोठं झालेल्यांनी संपवण्याची भाषा करू नये..

शिवसेना संपवण्यासाठी या महाराष्ट्रात आतापर्यंत ८० सेना स्थापन झाल्या, पण त्या सगळ्या संपल्या. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire-Chandrashekar Bawankule News, Aurangabad
Chandrakant Khaire-Chandrashekar Bawankule News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : जो भाजप पक्ष आमचं बोट धरून महाराष्ट्रात मोठा झाला, त्यांनी आम्हाला संपवण्याची भाषा करू नये. शिवसेना संपवण्यासाठी ८० सेना आल्या, त्या संपल्या पण शिवसेना अजूनही मजबुतीने उभीच आहे, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांना सुनावले.

बानवकुळे यांच्या उपस्थितीत नुकताच औरंगाबादेत भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी (Shivsena) शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणाऱ्या ठाकरेंनी आहे ते सांभाळावे नाहीतर ते देखील निघून जातील आणि कुटुंबातलेच उरतील असा टोला लगावला होता.

त्याला खैरेंनी प्रत्युत्तर देत भाजप हा आमचं बोट धरून मोठा झालेला पक्ष असल्याचे म्हटले. खैरे म्हणाले, भविष्यात देखील भाजप एकट्याच्या ताकदीवर काही करू शकणार नाही, त्यांना आमची मदत लागलेच. बावनकुळे हे ज्युनिअर आहेत, त्यांनी ठाकरे किंवा शिवसेनेवर टीका करण्यापेक्षा राज्याच्या विकासावर बोलावे.

अमित शहा सुर्य आणि उद्धव ठाकरे दिवा आहे असं ते म्हणाले. पण ते ज्युनिअर असल्यामुळे दिव्याच्या बाबतीत आपल्या पक्षाच्या जुन्या म्हणजे जनसंघाच्या नेत्यांची काय भूमिका होती हे आधी माहित करून घ्यावे. एखाद्या गावात शंभर मतं जरी मिळाली तर आम्ही आमचा दिवा शंभर घरात पोहचवला अशी, भूमिका तेव्हाचे नेते घ्यायचे.

Chandrakant Khaire-Chandrashekar Bawankule News, Aurangabad
Aurangabad : विरोधक आक्रमक झाल्याने आघाडी नको म्हणणारे एकत्र..

दिवा कायम पेटत असतो, तर सुर्य उगवतो आणि सायंकाळी मावळतो, असा टोला देखील खैरे यांनी लगावला. शिवसेना संपवण्यासाठी या महाराष्ट्रात आतापर्यंत ८० सेना स्थापन झाल्या, पण त्या सगळ्या संपल्या. ज्या शिवसेनेचे बोट धरून तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेला संपवण्याची भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही, असा टोला देखील खैरे यांनी बावनकुळे यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com