Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांची 'ती' भीती खरी ठरली! हत्येच्या आदल्या दिवशी बायकोला काय सांगितले? धक्कादायक माहिती समोर

Santosh Deshmukh Murder Case Wifes Statement : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी त्यांनी आपली पत्नी अश्विनी देशमुख यांच्याशी संवाद साधला होता. ते घाबरलेले आणि अस्वस्थ दिसत असल्याचे अश्विनी देशमुख यानी सांगत आपला जबाबात नोंदवले होते.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Case News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बुधवारी केज सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. या सुनावणीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिलेल्या जबाबातून हत्येच्या आदलया दिवशी संतोष हे आपल्याशी काय बोलले होते हे समोर आले आहे. त्यांनी व्यक्त केलेली भीती देखील खरी ठरली.

अश्विनी देशमुख यांनी जबाबात नमूद केले की, 'वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील.' असे संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी सांगितले होते. 7 आणि 8 डिसेंबर रोजी पती-पत्नीमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती.

वाल्मिक कराडच्या (walmik karad) साथीदार विष्णू चाटे याचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख प्रचंड अस्वस्थ झाले होते. फोनवर विष्णू चाटेने धमकी दिली होती की, तुला आमच्या आणि कंपनीच्यामध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिकअण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही.

Santosh Deshmukh Murder Case
Dhananjay Deshmukh On Pankaja Munde : पंकजा मुंडे गावात आल्या असत्या अन् त्यांच्या गाडीवर हल्ला झाला असता तर मला जबाबदार ठरवलं गेलं असतं!

या घटनेनंतर संतोष देशमुखांनी (Santosh Deshmukh) पत्नीला ही माहिती दिली होती आणि त्यांच्या मनात भीती घर करून बसली होती. पत्नी अश्विनी देशमुख यांनी त्यांना धीर दिला आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता.

संतोष देशमुखांनी आपल्या पत्नीला सांगितले होते की, वाल्मिक कराड गुंड आहे. त्याचे मोठ्या नेत्यांशी संबंध आहेत. हे लोक मला मारून टाकतील. दुर्दैवाने, त्यांच्या भीतीला काही तासांतच दुजोरा मिळाला. सीआयडीच्या तपास अधिकारी किरण पाटील यांनी हा अश्विनी देशमुख यांचा जवाब घेतला आहे.

Santosh Deshmukh Murder Case
NCP Mlc News : जागा 1 इच्छुक शंभर, त्यात पुण्याचे 2 मेंबर; कोणाचा लागणार नंबर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com