Sambhajiraje On Jalna Protest : 'आंदोलनस्थळी गोळीबार-ग्रेनेड हल्ल्याचे पुरावे दाखवत, संभाजीराजे फडणवीसांवर संतापले !

Sambhajiraje Chhatrapati On Devendra Fadnavis : "आजपर्यंत मराठा समाजाने सामंजस्यपणे मोर्चे काढले. यामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही."
Sambhajiraje Chatrapati
Sambhajiraje Chatrapati Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे, तर दुसरीकडे मराठा संघटना आणि आंदोलकही शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर संतप्त झाले आहेत. यावर आता आंतरवाली येथून माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Sambhajiraje Chatrapati
Shinde-Fadanvis-Pawar Politics : शिंदे-फडणवीस-पवार सरकार अलर्ट मोडवर; उद्या महत्त्वाची बैठक

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "काल जो अमानुष कृत्य झाला,त्यावर बोललं पाहिजे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी इथे आलो आहे. या जगात पहिल्यांदा आरक्षण शाहू महाराजांनी दिला. आज गरिब मराठ्यांवर अन्याय होत असल्यामुळे, तुमचा आवाज उठवण्यासाठी मी २००७ पासून बाहेर आहे. "

"आजपर्यंत मराठा समाजाने सामंजस्यपणे मोर्चे काढले. यामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही. काल जे काही घडलं, सरकारच्या माध्यमातून लाठीमार केला गेला, गोळ्या झाडल्या गेल्या, ग्रेनेड हे लोकांच्यावर उडवण्यात आले. हा नींदनीय प्रकार आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो," असे संभाजीराजे म्हणाले.

Sambhajiraje Chatrapati
Jalna Maratha Protest : लाठीचार्ज करणाऱ्या घमेंडिया मस्तवाल सरकारची मस्ती उतरविण्याची आली वेळ,अंतरवली घटनेवर रोहित पवार संतापले

"शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या राज्यात असे प्रकार होत आहेत. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता, हे सुराज्य आहे का? आंदोलकांवर गोळ्या झाडायच्या, हे मोघलांचं राज्य आहे का? हे निजामाचं राज्य आहे का? मराठा आंदोलकांवर गोळ्या घालायच्या असतील तर पहिल्यांदा संभाजीराजेंवर गोळी घाला," अशी उद्विग्न प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली. "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com