'2 वर्षांपासून आम्ही पुन्हा येऊ म्हणणारे आता थकलेत!'

आम्ही त्यांच्या ईडी- बिडी- सिडीला अजिबात मोजत नाही
Rajendra Shinagane
Rajendra Shinagane Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव (Jalgaon) जामोद (Jamod) तालुक्यातील भेंडवळ गावात आज 26/ 11 च्या मुहूर्तावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) कार्यकर्ता मेळावा पार पडला. एरवी शांत, संयमी नेते म्हणून ओळख असलेले मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) थेट पंतप्रधान, भाजप, राज्यातील विरोधी पक्षनेत्यांवर आक्रमक शाब्दिक हल्ला चढवत त्यांनी हा कार्यक्रम दणाणून सोडला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते पालकमंत्री राजेंद्र शिंगणे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचेच काय स्वपक्षीयांचे देखील अंदाज चुकविणाऱ्या या नेत्याने आज देखील सर्वांचे अंदाज चुकवीत गल्ली ते दिल्ली अश्या सर्वांनाच चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना मंत्री शिंगणे म्हणाले की, मागील 2 वर्षांपासून आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आता पार थकलेत, आता त्यांनी आशा सोडून दिली आहे, अशी खिल्ली उडवीत त्यांनी भाजपावर हल्ला चढविला.

Rajendra Shinagane
'संपाचा हट्ट कायम असेल तर कर्मचाऱ्यांचे रक्षण त्यांच्या पुढाऱ्यांनीच करावे'

याचवेळी त्यांनी ईडी- सीबीआय च्या छाप्यांवरुनही भाजपवर टीकास्त्र डागले. ''अलीकडे भाजपकडून ईडी- सीबीआय-आयकर विभागाची भीती दाखवून विरोधकांना दाबायचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. मात्र राज्यातील जनता आघाडी सरकारच्या पाठीशी असल्याने आम्ही त्यांच्या ईडी- बिडी- सिडीला अजिबात मोजत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

राज्यातील आघाडी सरकार उत्तमरित्या काम करीत असल्याने जनता आमच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी केला. वर्षभरापासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी व त्यांच्या सत्याग्रह बद्दल मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक समोर येत 'भाईयो और बहनो' म्हणत माफी मागितली. तीन केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या अभेध्य एकजुटीला ते घाबरले, असा हल्लाबोलही त्यांनी केला. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचेही शिंगणे यावेळी म्हणाले.

तर मित्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा त्यांचा नामोल्लेख न करता त्यांनी' राष्ट्रवादीचे दुकान मोठे असून त्याला बंद करण्याच्या भानगडीत पडू नका, त्यासाठी तुमच्या 7 पिढ्या जन्माला याव्या लागतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com