Bjp Leader Pankaja Munde News, Marathwada
Bjp Leader Pankaja Munde News, MarathwadaSarkarnama

Bjp News : प्रचार शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा, प्रसार पंकजांच्या नाराजीचा..

Pankaja Munde : मोदी-शहा यांची कृपादृष्टी पंकजांवर केव्हा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Published on

Marathwada Political : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रितम मुंडे अखेर बऱ्याच दिवसांनी बीडमध्ये दिसल्या. निमित्त होते मराठवाडा शिक्षक मतदासंघ निवडणूक प्रचार सभेंचे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप युतीचे उमेदवार किरण पाटील यांच्या विजयासाठी पंकजा-प्रितम मुंडे (Pankaja Munde) यांना बीड जिल्ह्यात प्रचारासाठी येण्याची गळ घातली आणि दोघींनीही ती मान्य केली.

Bjp Leader Pankaja Munde News, Marathwada
Chandrashekhar Bawankule : पंकजाताई आमच्या नेत्या, त्यांना पक्षातीलच एक गट बदनाम करतोय..

गेल्या दोन दिवसांपासून पंकजा आणि प्रितम मुंडे (Pritam Munde) या किरण पाटील यांना विजयी करा, असे आवाहन करत (Chandrashekar Bawankule) बावनकुळे यांच्यासोबत जिल्ह्यात सभा घेत आहेत. प्रचार मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचा असला तरी पंकजा यांच्या भाषणातून त्यांच्या नाराजीचा प्रसार जास्त होतोय असे दिसते. पंकजा मुंडे राज्यातील राजकारणातून डावलले जात असल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चांचा आता अतिरेक झाला आहे.

माध्यमांनी त्या नाराज असल्याच्या बातम्या चालवायच्या आणि नेत्यांकडून त्यांच्या अंगात भाजपचे रक्त आहे, त्या पक्ष सोडून कधीच वेगळा विचार करणार नाही, असे स्पष्टीकरण दिले जाते हे आता नेहमीचेच झाले. बरं त्या नाराज नाही हे सांगण्यासाठी एकतर बावनकुळे किंवा चंद्रकांत पाटील हे दोनच नेते पुढे येतात. इतर राज्यातील आणि देशातील नेते मात्र या चर्चेची कधी दखलही घेत नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या पंकजा-प्रितम मुंडे या भगिनींचा बीड जिल्हा आणि राज्याच्या इतर भागात देखील प्रभाव आहे.

त्यात पंकजा मुंडे यांच्याकडे लोकनेत्या म्हणून पाहिले जाते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याबातीत राज्याच्या राजकारणात अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे त्या बाजूला पडल्या. गोपीनाथ गडावरील दसरा मेळावा, गोपीनाथ मुंडे यांची जयंती, पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या आपल्या समर्थकांशी संवाद साधतात आणि आपल्या मनातील व्यथा मांडतात. भाजपने त्यांच्याबाबतीत वेट अॅन्ड वाॅचची भूमिका घेतल्याचे दिसते.

पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवत त्या आमच्यासाठी किती महत्वाच्या आहेत हे दिल्लीतल्या नेत्यांनी एकीकडे दाखवले, तर राज्य आणि केंद्रातील सत्तेत त्यांना काहीच न देता सूचक इशारा देखील दिला. या संभ्रमावस्थेमुळे नुकसान मात्र पंकजा मुंडे यांचेच झाले. बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून प्रदेशाध्यक्षासोबत पंकजा मुंडे किरण पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. यामध्ये किरण पाटील यांना मत देण्याच्या आवाहनापेक्षा पंकजा यांच्या नाराजी, त्या गहिणीनाथ गडावर गैरहजर का राहिल्या? याच्याच चर्चा अधिक झाल्या.

Bjp Leader Pankaja Munde News, Marathwada
30-30 Scam : नोटबंदी झाली, अन राठोडला पैसे येणे बंद झाले..

माध्यमांशी बोलतांना मी नाराज नाही हे सांगतांनाच मोदी, शहा हेच माझे नेते आहेत, माझे प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले अशा प्रकारची विधाने करत पंकजा यांनी फडणवीसांबद्दल असलेला आपला राग व्यक्त केलाच. मी राष्ट्रीय पातळीवर काम करते हे सांगत फडणवीसांचे नेतृत्व झुगारणाऱ्या पंकजा यांना थेट केंद्रातूनच राज्यात मोठी जबाबदारी मिळावी अशी अपेक्षा आहे. पण सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता ते शक्य नाही असेच दिसते.

अर्थात भाजप हा धक्कातंत्र देणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री होती असे वाटणारे फडणीवस उपमुख्यमंत्री झाले, अन शिंदेंची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली. सध्या शिंदे यांच्या पाठीशी `चट्टाण` सारखे उभे असलेले मोदी-शहा यांची कृपादृष्टी पंकजावर केव्हा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तो पर्यंत पंकजा नाराज आहेत ही माध्यमांची चर्चा आणि त्या नाराज नाहीत हे नेत्यांचे स्पष्टीकरण ऐकून घेण्याची सामान्यांना तयारी ठेवावीच लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com