अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला मुंडे आले धावून; तुम्ही काळजी करु नका, कुटुंबाला दिला धीर

रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सूचना दिल्या.
Dhananjay Munde
Dhananjay Mundesarkarnama
Published on: 
Updated on: 

परळी : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज (ता.२) रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. बीड (Beed) वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एका तरुण दुचाकीस्वाराचा अपघात होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघात ग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली.

Dhananjay Munde
तुम्हाला आश्चर्य वाटेल.. पण राज ठाकरेंचे हे स्क्रिप्ट राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारे!

धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली. आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी (ता. परळी) इथला असल्याचे सांगितले. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. हे पाहून धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन करायला सांगितला. मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली. मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या. तसेच रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या.

Dhananjay Munde
विरोधकांकडून घरे पेटविण्याचे काम... आदित्य ठाकरे

सदर तरुणास अंबाजोगाई कडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघात ग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली, तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय, रुग्णालयात देखील मी बोललो आहे, अशी माहिती देऊन त्यांना धीर दिला, तसेच त्यांनाही अंबाजोगाई ला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com