Bachchu Kadu On Sadabhau Khot : 'सदाभाऊ खोत यांना हकलले, यापुढे जनता तुडवणार'; बच्चू कडूंनी आणखी भडका उडवून दिला

Solapur Farmers Drive Away Sadabhau Khot Amravati Bachchu Kadu Warns BJP Mahayuti Govt : सोलापूर इथून सदाभाऊ खोत यांना हकलण्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजप महायुती सरकारला सूचक इशारा दिला आहे.
Bachchu Kadu On Sadabhau Khot
Bachchu Kadu On Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu warning BJP : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले‌ होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसमोर सदाभाऊ खोत टिकाव धरू न शकल्याने त्यांना गावातून पाहणी न करताच काढता पाय घ्यावा लागला.

यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी टायमिंग साधत भाजप महायुती सरकारला सूचक इशारा दिला. सदाभाऊ खोत यांना हकललं आहे, यापुढे जनता तुडवणार, असा सूचक इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. बच्चू कडू यांचं हे टायमिंग म्हणजे, भाजप महायुती सरकारसह सदाभाऊ खोत यांना झोंबणार, असंच ठरलं आहे.

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "राज्यातील पूरस्थिती भयंकर आहे. घरं, शेत जमीन, शेतकऱ्यांची जनावरं, सर्व काही पाण्याखाली गेल आहे. या पुराच्या फटक्यातून किमान दोन वर्ष शेतकरी सावरत नाही. सरकार एनडीआरएफच्या निकषाबाहेर जायला तयार नाही. या निकषानुसार अनुदान कधी मिळेल याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ओला दुष्काळ घोषित करण्याची गरज सध्या आहे."

'सरकार कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) संताप आहे. शेतकऱ्यांचा संताप का आहे हे सदाभाऊ खोत यांनी देखील समजून घेतलe पाहिजे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याने आता संताप व्यक्त करण्याची गरज आहे. सरकार अजूनही बिनधास्त आहे. मुख्यमंत्री म्हणतात, कर्ज मार्चमध्ये फेडावे लागतं. म्हणजे शेतकऱ्यांची स्थिती मार्चपर्यंत सुधारणार आहे, असं मुख्यमंत्र्यांना वाटतं का?,' असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.

Bachchu Kadu On Sadabhau Khot
Top 10 News : आसिफ सुलतान आयुक्तांवर धावून गेले, शरद पवारांनी टाकला डाव, लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली... यासह वाचा Top Ten राजकीय घडामोडी...

सरकार लबाड आहे. आधी दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ म्हणत होते. दुष्काळ पडल्यावर मुख्यमंत्री मार्चपर्यंत कर्ज फेडायची व्यवस्था आहे, असं म्हणतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची पावलोपावली भूमिका बदलत असल्याचे दिसते. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुकीच्या तोंडावर तीन हप्ते अगोदर दिले. कारण सरकारला मत हवं होतं. दुसरीकडे शेतकरी अडचणीत आहे. पण सरकारला मताचा काही संबंध नाही. त्यामुळे सरकार कर्जमाफी करत नाही, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.

Bachchu Kadu On Sadabhau Khot
Election Commission Plan : 'स्थानिक'च्या निवडणुकांचा क्रम बदलणार? 'झेडपी' लांबणीवर, अगोदर नगरपालिका अन् महापालिका?

शेतकऱ्यांनी सदाभाऊंना केवळ हाकलून दिलं. यानंतर मात्र शेतकरी नेत्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा सूचक इशारा बच्चू कडू यांनी दिला.

नेमकं काय झालं

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत आज माढा तालुक्यातील उंदरगावात पूरस्थितीची पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी शेतकरी आक्रमक झाले‌ होते. शेतकऱ्यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला. शेतकऱ्यांनी मदतीविषयी जाब विचारला. यावेळी हतबल झालेल्या सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसोबत हातही जोडले. तरीही शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या या रोषणानंतर सदाभाऊ खोत यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

शेतकऱ्यांचा खोतांवर संताप का?

‘आठ दिवस कुठं होता?, आम्ही वर्गणी काढून 2009च्या निवडणुकीत लीड दिला ते आमच्याकडे 16 वर्षांनी आलेत,’ असे म्हणून शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोतांना घेरले. शेतकऱ्यांचा संताप पाहून अखेर सदाभाऊंनी खोतांनी हात जोडले. ज्या गावाने वर्गणी काढून सदाभाऊ खोत यांना निवडणुकीसाठी मदत केली, तिथं ते तब्बल 16 वर्षांनी पोचले. त्यावर खरा शेतकऱ्यांचा रोष होता. सरकारमधील मंत्री अन् आमदारांचे नुसते पाहणी दौरे होत आहे. पण प्रत्यक्षात मदत होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com