सोनिया आणि राहुल गांधींनी प्रज्ञा सातव यांना दिलेला शब्द पाळला

( Prdnya Rajiv Satav Hingoli) हिंगोली जिल्ह्यात प्रज्ञा सातव यांचा देखील स्वतंत्र जनसंपर्क निर्माण झाला. आता विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या जिल्हा आणि मतदारसंघातील प्रश्न देखील सोडवू शकतील
Pradnya Satav-Rahul-Soniya Gadhi
Pradnya Satav-Rahul-Soniya GadhiSarkarnama
Published on
Updated on

हिंगोली ः काॅंग्रेसचे दिवंगत विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या जागेवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली. खरतर राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी प्रज्ञा सांवत यांचा विचार होईल, अशी चर्चा होती. परंतु काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली.

त्यामुळे कदाचित प्रज्ञा यांना राजीव सातव यांच्या हिंगोली किंवा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्येच उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात होते. मात्र शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठीच प्रज्ञा सातव यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी पसंती दर्शवली.

राजीव सातव यांच्या निधनानंतर संपुर्ण काॅंग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंब सातव यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कपणे उभे राहील, अशी ग्वाही राहुल गांधी, प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांनी दिली होती. दरम्यान, वेळोवेळी त्यांनी सातव यांच्या कुटुंबियांची चौकशी देखील केली.

राजीव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचा विचार होतोय, त्यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत्या. कारण काही महिन्यांपुर्वीच महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून प्रज्ञा यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु तेव्हा प्रज्ञा यांच्या ऐवजी रजनी पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले.

यावर प्रतिक्रिया विचारली असता पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, असे प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले होते. अखेर राहुल गांधी यांनी सातव कुटुंबियांना दिलेला शब्द खरा करून दाखवला असेच म्हणावे लागेल. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या विजय देखील निश्चित समजला जात आहे.

प्रज्ञा सातव यांचे पदव्युत्तर पर्यंत शिक्षण झालेले आहे. त्या गृहणी असल्या तरी राजीव सातव यांच्या पश्चात शैक्षणिक संस्था, दुध संस्था, गॅस एजन्सी व पेट्रोल पंपाचा संपुर्ण व्यवहार त्याच पाहत होत्या. राजीव सातव यांच्यावर काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. गुजरात व पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीत राजीव यांच्यावर महत्वाची जबाबदारी होती.

Pradnya Satav-Rahul-Soniya Gadhi
औरंगाबाद-पैठण महामार्गाची रुंदी वाढवणार; पाणी पुरवठा योजनाही वेळेतच पुर्ण होणार

त्यामुळे ते सातत्याने दिल्ली व देशातील इतर राज्यांमध्ये दौऱ्यावर असयाचे. अशावेळी हिंगोली-कळमनुरी मतदारसंघातील जनसंपर्क, लोकांची कामे, समस्या प्रज्ञा सातव याच जाणून घ्यायच्या. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतांनाच त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील आपले योगदान दिले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात प्रज्ञा सातव यांचा देखील स्वतंत्र जनसंपर्क निर्माण झाला.

आता विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या जिल्हा आणि मतदारसंघातील प्रश्न देखील सोडवू शकतील, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com