औरंगाबाद-पैठण महामार्गाची रुंदी वाढवणार; पाणी पुरवठा योजनाही वेळेतच पुर्ण होणार

(Guardian Minister Subhash Desai Meet Central Minister Nitin Gadkari) राज्य शासनाने मंजूर केलेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी या मार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्याची गरज असल्याचे देसाई यांनी सांगितले.
Minister Subhash Desai-Nitin Gadkari
Minister Subhash Desai-Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे औरंगाबाद शहरासाठी मंजूर असलेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामावर चर्चा करण्यासाठी आज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी सुभाष देसाई यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्यांतील औट्रम घाटातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सात किलोमीटरचा बोगदा तयार करण्याची गरज असून त्यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी आवश्यक असल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निधी मंजूर करून तत्काळ बोगद्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणीही देसाई यांनी केली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शिर्डी-औरंगाबाद दरम्यान दुहेरी महामार्गाचे काम हाती घेतले असून त्यासाठी विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करावी. डीएमआयसी अंतर्गत असलेल्या ऑरिक सीटीच्या विकासासाठी शेंद्रा ते बिडकीन दरम्यान चारपदरी महामार्ग तातडीने पूर्ण करण्यात यावा.

तसेच औरंगाबाद ते पैठण दरम्यान चार पदरी महामार्गाचा प्रश्न मार्गी लावावा, असेही देसाई म्हणाले. औरंगाबाद-पैठण दरम्यानचा ४५ मीटर रुंदीच्या चारपदरी महामार्ग करण्यास मंजुरी मिळालेला आहे. याच मार्गालगत औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली १६८० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची आहे.

Minister Subhash Desai-Nitin Gadkari
मी एकनाथ शिंदेचा लाडका, म्हणूनच विकासकामांसाठी निधी मिळतो

पाइपलाइन टाकण्यासाठी या मार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्याची गरज असल्याचे देसाई यांनी सांगितले. यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. दरम्यान, यामुळे औरंगाबाद शहराची पाणी पुरवठा योजनेला गती मिळणार असल्याचा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com