Video Manoj Jarange : पाठीशी उभे रहा, अन्यथा तुमचे दारात येण्याचे बंद करू, जरांगेंचा इशारा !

Maratha Reservation In Maharashtra : सर्व आमदारांनी मराठ्यांच्या पाठीमागे उभे रहायला पाहिजे. निवडणुकीत आम्ही सर्व आमदारांनाही मतदान करत असतो. याची जाण ठेवत अधिवेशात हा प्रश्न निकाली काढा
Manoj Jarange News
Manoj Jarange News Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने सुरु केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी उभे रहा, नाही तर तुमचे दारात येण्याचे बंद करू असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा नेत्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा विधानसभेत एकालाही मदत करणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मराठा समाजाने मागणी केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा शब्द राज्य सरकारने दिलेला आहे. एका महिन्याच्या आत 13 जुलैपूर्वी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिलेले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. पुढील आठवड्यात राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार असून यामध्ये मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश निघण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange News
Jarange Vs Bhujbal : "भुजबळांना थोड्या दिवसांत जनावरांचं इंजेक्शन अन् गोळ्या घ्याव्या लागणार"

मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काय होते, याचा अनुभव नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीत सहभागी असलेल्या घटक पक्षांनी घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचा रोष ओढवून घ्यायचा नसेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी देखील सर्वपक्षीय आमदारांना सुनावले आहे.

मराठा (Maratha) समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्व आमदारांनी मराठ्यांच्या पाठीमागे उभे रहायला पाहिजे. निवडणुकीत आम्ही सर्व आमदारांनाही मतदान करत असतो. याची जाण ठेवत अधिवेशात हा प्रश्न निकाली काढा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. मराठा नेत्यांनी याकडे गांर्भीयाने न पाहिल्यास विधानसभेत एकालाही मदत करणार नाही. इतकेच नाही तर तुमचे दारात येण्याचे बंद करू असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Manoj Jarange News
Pankaja Munde : ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा थेट सरकारलाच इशारा; म्हणाल्या...

आमच्या मागण्यांबाबत आवाज उठवणे हे आमदारांचे काम आहे, अन्यथा मराठा समाज दारात उभा करू देणार नाही. अधिवेशनात देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा. कोण पत्र द्यायला येत नाही, याकडे मराठा लक्ष देत आहेत. जे मराठा नेते आरक्षण मिळावे यासाठीचे पत्र द्यायला येत नाही, त्यांच्या जवळचे आमदार पडलेच म्हणून समजा, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com