Chhatrapati Sambhajinagr : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यात घ्या, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगही कामाला लागले आहे. निवडणुक सज्जतेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून महापालिकांना पत्र पाठवली जात आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला या संदर्भातील पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
महापालिकेकडे (Municipal Corporation News) काय यंत्रणा आहे, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह मनुष्यबळ किती आहे, याची माहिती कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आयोगाला माहिती कळविली जाणार असून, आज (ता. २४) प्रशासकांनी यासंदर्भात बैठक बोलावली आहे. महापालिकेची निवडणूक पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडली होती.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात आदेश देत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली. (Chhatrapati Sambhjinagar) काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राज्य शासनाला पत्र देऊन चार महिन्यांत प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महापालिकेला पत्र देण्यात आले. प्रशासक जी. श्रीकांत यांनी या सदंर्भात माहिती दिली. चार मुद्द्यांआधारे आयोगाने माहिती मागवली.
त्यात कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट किती आहेत? स्ट्राँग रूम म्हणून वापर करण्यासाठीचे गोदाम किती आहेत? मनुष्यबळ किती आहे? आयटीचा वापर करून निवडणुकीचा फॉर्मेट कसा तयार करता येईल? या विषयांचा समावेश आहे. महापालिकेकडे कंट्रोल युनिट एकही नाही. बॅलेट युनिट मात्र 39 आहेत. अन्य माहिती आणि तयारीच्या संदर्भात आज बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर आयोगाला माहिती पाठवण्यात येईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
दहा टक्के वाढ अपेक्षित
विधानसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदारांपेक्षा दहा टक्के जास्त मतदार गृहीत धरून निवडणुकीचे नियोजन करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रात प्रभाग रचनेचा कोणताही उल्लेख नाही, प्रभाग रचनेबद्दलची माहितीदेखील या पत्रात देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणीही यासंदर्भात अफवा पसरवू नये, राज्य शासनाच्या आदेशानंतर प्रभाग रचना ठरविण्यात येईल, असे श्रीकांत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.