Amit Deshmukh: लातूर विमानतळासाठी मोठ्या निधीला मंजुरी! अमित देशमुखांनी मानले महायुती सरकारचे आभार; आता 'ही' केली मोठी मागणी

Amit Deshmukh: लातूर विमानतळाच्या विविध विकासकामांसाठी राज्य सरकारने मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे. याबद्दल काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
MLA Amit Deshmukh
MLA Amit Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Amit Deshmukh: लातूर विमानतळाच्या विविध विकासकामांसाठी राज्य सरकारने मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे. याबद्दल काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत, त्यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्याचबरोबर आता या विमानतळावरुन कार्गो सेवा सुरु करावी अशी मागणीही त्यांनी सरकारकडं केली आहे.

MLA Amit Deshmukh
Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची फेसबूकवर आक्षेपार्ह फोटोद्वारे बदनामी! 14 जणांवर गुन्हा दाखल

लातूर येथील विमानतळाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम, धावपट्टीचा विस्तार, नाईट लँडिंगची व्यवस्था व इतर सोयी सुविधांची कामे तातडीने पूर्ण करून येथून उड्डाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांनी अनेक भेटींद्वारे केल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. या मागण्यांचा विचार करुन राज्य शासनानं लातूर विमानतळासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय विमानतळ देखभाल दुरूस्तीसाठी दरवर्षी 38 लाख रुपये स्वतंत्रपणे देण्यात येणार असल्याची घोषणा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

उद्योग मंत्र्यांच्या दालनात या संदर्भाने विस्तृत बैठकीही झाली होती. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रश्न उपस्थित करून या संदर्भाने चर्चा घडवून आणण्यात आली होती, त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. लातूर विमानतळ येथून विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अमित देशमुख यांनी शासनाचे मनःपूर्वक आभारही मानले आहेत.

MLA Amit Deshmukh
MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

कार्गो विमानसेवा सुरू करा

लातूर ही कृषी मालाची देशातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथील साखर, डाळी, खाद्यतेल, भाजीपाला तसेच द्राक्ष व केशर आंबा संपूर्ण देशात व जगभरात विक्रीसाठी जातो. ही बाब लक्षात घेता लातूर येथून कार्गो विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीनेही या विमानतळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणीही अमित देशमुख यांनी केली होती.

अद्ययावत यंत्रणा बसवा

त्याचबरोबर काही महिन्यापूर्वी बारामती येथे घडलेली विमान अपघाताची दुर्दैवी घटना लक्षात घेता, भविष्यात अशा अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, लातूरसह राज्यातील सर्वच विमानतळे अद्यावत तंत्रज्ञान आणि विमानतळ चालवण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे हस्तांतरित करावीत, अशी मागणी आपण महाराष्ट्र शासनाकडे केल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मागण्याचाही शासन निश्चितपणे विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com