MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

Madras High Court verdict, Radhapuram election case : कोर्टाने निवडणूक आयोग तसेच विधानसभा सचिवालयाला कागदपत्रांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहे.
Madras High Court
Madras High CourtSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu election dispute : मद्रास हायकोर्टाने बुधवारी अभूतपूर्व निकाल दिला आहे. तमिळनाडूतील राधापुरम विधानसभा मतदारसंघाच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजय उमेदवाराची निवड कोर्टाने अवैध ठरविली आहे. कोर्टाने पराभूत उमेदवाराला विजयी घोषित केले आहे.

राधापुरम मतदारसंघातून २०१६ च्या निवडणुकीत ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) चे उमेदवार आय. एस. इबदुराई विजयी झाले होती. त्यांची निवड कोर्टाने रद्द केली आहे. या निवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) चे उमेदवार एम. अप्पावू हेच कायदेशीररित्या विजयी झाले होते, असा निकाल कोर्टाने दिला आहे.

काय आहे प्रकरण?

अण्णा द्रमुकचे उमेदवार इबदुराई यांनी डीएमकेच्या अप्पावू यांचा अवघ्या ४९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी हे राज्यातील सर्वात कमी मताधिक्य होते. मात्र, या मतमोजणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप अप्पावू यांनी केला होता. त्यांनी या निकालाला मद्रास हायकोर्टात आव्हान दिले होते.

Madras High Court
RBI gold sale : PM मोदींकडून सोनं न घेण्याचे आवाहन अन् 'आरबीआय'ने 12 अब्ज डॉलर किंमतीचे सोने विकल्याची बातमी; बँकेनेच केला खुलासा...

अप्पावू यांनी टपाली मतपत्रिकांची छानणी आणि मोजणीवर आक्षेप घेतला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेली जवळपास ३०० टपाली मते बेकायदेशीरपणे बाद ठरवली होती. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही मते साक्षांकित केली असून ते राजपत्रित अधिकारी नाहीत, असे कारण अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु, शासकीय नियमांनुसार ते राजपत्रित दर्जाचेच होते, असा दावा अप्पावू यांनी कोर्टात केला होता.

अप्पावू यांनी ईव्हीएम मतांच्या मोजणीतही फेरफार झाल्याचा आरोप केला होता. मतमोजणीच्या १९ व्या, २० व्या आणि २१ व्या फेरीत इबदुराई यांना ३४८ अधिकची मते नियमबाह्य पद्धतीने वाढवून दाखविल्याचा आक्षेप अप्पावू यांनी घेतला होता.

Madras High Court
Mamata Banerjee news : बंगालच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप; ममता बॅनर्जींच्या हातून पक्ष जाणार? बडतर्फ आमदारानेच घातला घाव

कोर्टाने अप्पावू यांचे आक्षेप ग्राह्य धरत टपाली मते आणि ईव्हीएमधील मतांची पुनर्मोजणी करण्याचे आदेश सप्टेंबर २०१९ मध्ये दिले होते.या पुनर्मोजणीमध्ये अप्पावू यांच्या बाजूने निकाल लागला होता. याच आधारावर कोर्टाने अप्पावू यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. कोर्टाने निवडणूक आयोग तसेच विधानसभा सचिवालयाला कागदपत्रांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहे. अप्पावू यांचे नाव २०१६-२०२१ या काळातील आमदार म्हणून नमूद करावे, असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com