

Gopichand Padalkar: भाजपचे नेते आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची समाज माध्यमांवर व्यक्तिगत, वैयक्तिक व सामाजिक बदनामी होईल असे फोटो तयार करून पोस्ट करण्यात आले होते. यासंदर्भात पडळकर यांचे कार्यकर्ते चंद्रकांत लवटे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फेसबुकवरील संबंधित १४ अकाउंट संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांकडून या १४ अकाउंट धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकर यांचे सोशल मीडियात आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्यात आले होते, एक जून रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत पडळकरांचे कार्यकर्ते चंद्रकांत लवटे यांनी, ही बाब आटपाडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली होती. आमदार पडळकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक फोटो पोस्ट झाल्यानं या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी लवटे यांनी केली. याप्रकरणी या १४ फेसबूक अकाऊंट्सवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
किरण हुलवाल, संकेत गावडे, संदीप धुपे, धनाजी यमगर, अनिकेत दीने, विजयाताई मोटे एफसी, संदीप निगडी, निलेश पडळकर, सचिन मोटे, सुनील धनगर, प्रेरणास्थान सचिन मोटे, हनुमंतराव पवार यांच्यासह अन्य आयडी धारकांच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर आमदार गोपीचंद पडळकर यांचे आक्षेपार्ह फोटो तयार करून व्हायरल केले आहेत. त्याला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, तरी देखील अशा अकाऊंटवरून सातत्याने फोटो पोस्ट होत असल्याने आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.