दानवेंच्या प्रयत्नांना यश; जालना-जळगांव रेल्वे मार्गाच्या सर्वेला मंजुरी

यामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योग, पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार आहे. (Raosaheb Danve)
Railway State Minister Raosaheb Danve
Railway State Minister Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या अंतर्गत जालना - जळगाव रेल्वे मार्गाचा 'फायनल लोकेशन सर्वे' ८ फेब्रुवारी रोजी मंजूर केला आहे. (Raosaheb Danve) ज्या रेल्वे मार्गाचे पूर्वी कामे झाली (Jalna) आहेत ते जसेच्या तसे ठेवून कोणत्याही मार्गाच्या कामात हस्तक्षेप न करता जालना जिल्ह्यातील लोकांच्या सोयीसाठी जालना- जळगाव १७४ किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. (Marathwada)

यासाठी अंदाजे साडेचार कोटी रुपये फायनल लोकेशन सर्वे साठी मंजुर केले असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली. यामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योग, पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

जालना जिल्ह्यातील पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा मार्ग ७० टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे. याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्राप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.

लवकरात लवकर याचे काम पुर्ण होणार असून अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ, या रेल्वे मार्गामुळे जगभरातील पर्यटकांची सोय होणार आहे. मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी देखील ही एक पर्वणी ठरेल.

Railway State Minister Raosaheb Danve
शक्ती कायद्यामुळे महिलांवरील अत्याचारांना चाप बसेल

अनेक वर्षापासून या भागातील जनतेची ही आग्रही मागणी लक्षात घेता हा निर्णय घेतल्याने उशिरा स्वातंत्र्य मिळवलेल्या मराठवाड्याच्या या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हा रेल्वे मार्ग झाल्याने होईल, असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com