Sharad Pawar NCP News : उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांचाही भाजपला दणका; 'हे' माजी आमदार करणार पवार गटात प्रवेश!

Sharad Pawar Vs BJP News : मोजक्या समर्थकांसह मुंबईत शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाची तुतारी फुंकणार आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sudhakar Bhalerao Former BJP MLA : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात महायुतीला जोरदार दणका दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपला धक्क्यावर धक्के देणे सुरू केले आहे. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शिवसंकल्प दौऱ्यात माजी उपमहापौर आणि काही नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत भाजपला झटका दिला. त्यानंतर आता ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवारांकडून भाजपला मराठवाड्यात दुसरा दणका बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी भाजप(BJP) आमदार सुधाकर भालेराव यांचा पवार गटातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 11 जुलै रोजी आपल्या मोजक्या समर्थकांसह मुंबईत शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाची 'तुतारी' ते फुंकणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे उदगीरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने भालेराव यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

Sharad Pawar
ShivsenaUBT News : राजू शिंदे चंद्रकांत खैरेंच्या गटात ? उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होताच घेतली भेट

महिनाभरापुर्वीच सुधाकर भालेराव यांची शरद पवारांची भेट घेतली होती. तेव्हाच ते भाजपला रामराम करणार हे स्पष्ट झाले होते. अखेर त्यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी अकरा वाजता सुधाकर भालेराव यांचा प्रवेश होईल.

त्यानंतर लवकरच उदगीर येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी उदगीर मतदारसंघातील भालेराव समर्थक मोठ्या संख्येने पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे हे उमेदवार असतील. भाजपला ही जागा सुटण्याची शक्यता नाही.

Sharad Pawar
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठी लढाई जिंकली! निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय

भालेराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश हा उदगीरमधून उमेदवारीच्या शब्दावरच होत असल्याचे बोलले जाते. सहा महिन्यांपूर्वी अहमदपूरचे माजी आमदार विनायक पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. लोकसभेच्या बीड मतदारसंघात विजय मिळवत शरद पवारांनी पुतणे अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह महायुतीला शह दिला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अजित पवारांची राष्ट्रवादी खिळखिळी करण्याची खेळी शरद पवारांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com