Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत संभाजीनगरच्या स.भु. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी!

Sunetra Pawar Deputy CM News : मराठवाड्यातील धाराशीव येथील बाजीराव पाटील यांच्या कुटुंबात जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन महाविद्यालयात झाले होते.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics News : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान आज सुनेत्रा पवार यांनी पटकावला. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर उद्धभवलेल्या राजकीय परिस्थितीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदी त्यांची निवड आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांना देण्यात आली. मराठवाड्यातील धाराशीव येथील बाजीराव पाटील यांच्या कुटुंबात जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन महाविद्यालयात झाले होते.

1983 मध्ये मराठवाड्याची लेक असलेल्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण शहरातील स. भु. कला वाणिज्य महाविद्यालयात झाले. बहिणीसोबत स. भु. च्या मुलींच्या वसतीगृहात राहून त्यांनी शिक्षण पुर्ण केले. दरम्यान, साधेपणा, मोठ्या घराण्याचा कोणताही बडेजाव न दाखवलेला त्यांचा स्वभाव संपर्कातील सर्वांनाच भावला होता.

Sunetra Pawar
Ajit Pawar Death : दादांची शेवटची सही सुद्धा स्मशानभूमीच्या कामासाठी, दुर्दैवी योगायोग सांगताना सरोज अहिरेंना अश्रू आवरेना

सुनेत्रा यांचे शिक्षण आणि जडणघडण स. भु. महाविद्यालयात झाली. त्या काळात महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून जीवन देसाई आणि वसतिगृह प्रमुख म्हणून सुषमा देवधर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. 1980-81 ते 1982-83 या कालावधीत त्यांनी बी. कॉम. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेत शिस्त, कष्ट आणि जिद्द या गुणांमुळे त्या वेगळ्या ठरल्या. स. भु. मुलींच्या वसतिगृहातील वास्तव्याने त्यांच्यात स्वावलंबन, नेतृत्व आणि समाजभान अधिक दृढ झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत पहिली महिला उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह आजी माजी प्राचार्य, प्राध्यापकांनी सुखद भावना व्यक्त केल्या.

Sunetra Pawar
Ajit Pawar death : अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी ममता–राऊतांनंतर आता शिंदेंचा शिलेदाराही मैदानात, 'सत्य...' म्हणत फडणवीसांवर वाढला दबाव

आमची विद्यार्थीनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद

स. भु. महाविद्यालयातून सुनेत्रा पवार यांनी बी. कॉम. पदवीचे शिक्षण पुर्ण केले. त्या स्वभावाने खुप चांगल्या विद्यार्थीनी म्हणून मी प्राचार्य असतांना माझ्या परिचयात होत्या. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी मी मोठ्या घराण्यातील आहे, असे कधी दाखवले नाही. नंतर त्या इथे आल्या नाहीत. स. भु. चे प्राध्यापक एकवेळ मोहन फुले यांच्यासह बारामतीला गेले होते. त्यांनी आवर्जून स. भु. ची आत्मीयतेने विचारपुस करून माझी आठवण काढली. महाविद्यालयीन आठवणी सांगितल्या. महाविद्यालय काळात त्या इतर अॅक्टीव्हिटीत फारशा सहभागी होत नसत. मात्र, पुढे लग्नानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानाच्या अनेक प्रकल्पात सक्रिय योगदान दिले. आमची विद्यार्थीनी उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचे स. भु. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य जीवन देसाई यांनी म्हटले आहे.

Sunetra Pawar
Sunetra Pawar News: धाराशिवची लेक झाली बारामतीच्या 'वहिनी'; समाजकारण ते उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांविषयी जाणून घ्या सर्वकाही

भाऊ मंत्री तरी वागण्या-बोलण्यात साधेपणा..

स. भु. महाविद्यालयात सुनेत्रा पाटील या बी. कॉम. मराठी मिडीयम आणि मी इंग्रजी मिडीयमध्ये एकाच काळात होतो. त्यावेळी त्‍यांच्या बहिण सुवर्णा पाटील यांच्या समवेत त्या स. भु. च्या मुलींच्या वसतीगृहात राहत असत. अतिशय संस्कारी, वर्गात नियमीत उपस्थिती, मेरीटच्या त्या विद्यार्थीनी होत्या. त्यांचे बंधू पद्मसिंह पाटील (Padamsinh Patil) मंत्री होते. तरीही त्यांच्या वागण्यातून त्यांनी कधी याचा बडेजाव दाखवला नाही. आमचा एक ग्रुप होता त्यात सतीश चव्हाण, कादंबरी असे अनेक विद्यार्थी होतो. त्या ग्रुपमध्ये चांगले बाऊंडिंग होते. काव्यवाचन, स्नेहसंमेलनात एकमेकांना प्रोत्साहन दिल्या जायचे. त्या काळात त्यांनी मला घरीही बोलावले होते. त्यांचा जुना वाडाही दाखवला. आज त्या उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल स.भु. महाविद्यालयाचे सहचिटणीस रामेश्वर तोतला यांनी आनंद व्यक्त केला.

Sunetra Pawar
Sunetra Pawar : ना भुजबळ, ना पटेल, ना तटकरे ; अजितदादांच्या खास दोस्ताने फिरवली सगळी सूत्र, म्हणूनच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com