Maharashtra Assembly Election 2024 : राजकीय निवृत्ती जाहीर करून पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारस जाहीर करणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनाच माजलगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. काका प्रकाश सोळंके यांनी उमेदवारीसाठी मांडलेला फॉर्म्युला फेल गेला आहे.
तुतारीची उमेदवारी रमेश आडसकर यांच्या ऐवजी मोहन जगताप यांना मिळाली आहे. त्यामुळे आता आम्हाला उमेदवारी द्या, असा फॉर्म्युला घेऊन पुतणे जयसिंग सोळंके यांचे समर्थक बारामतीला अजित पवार यांच्या घरासमोर ठिय्या मांडून बसले आहेत.
मागच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेवटपर्यंत प्रकाश सोळंके यांनी ही आपली शेवटची निवडणूक असा प्रचार केला होता. (Beed News) आता महिन्यांपूर्वी त्यांनी आपण निवडणूक लढविणार नाही व पुतणे जयसिंग सोळंके हे आपले राजकीय वारसदार असतील असे जाहीर केले. त्यामुळे जयसिंग सोळंके हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील असे निश्चित मानले जात होते. त्यांच्या समर्थकांनी 'भावी आमदार' असे बॅनर देखील मतदार संघात लावले.
पण, ऐनवेळी निवृत्ती घेतलेल्या प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने जयसिंग सोळंके यांचा हिरमोड आणि समर्थकांचा भ्रमनिरास झाला. जयसिंग सोळंके यांच्या समर्थकाने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला विचारणा केल्याबाबतची भ्रमणध्वनीवरील संवादाची क्लिप व्हायरल झाली आहे.
यात जयसिंग सोळंके यांना उमेदवारी द्यायचे निश्चित झाले होते. मात्र, आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वतः 'रमेश आडसकर यांच्या विरोधात लढत द्यायची तर आपण स्वतःच उमेदवार असावे लागते' असे प्रकाश सोळंके यांचे म्हणणे होते.
सुरुवातीला प्रकाश सोळंके यांनीच जयसिंग सोळंके यांचे नाव समोर केले होते. त्यानंतर त्यांचे आई-वडिल आपल्याला भेटलेही. (Ajit Pawar) त्यात आपण हा तुमच्या घरचा मुद्दा असल्याचे सांगीतले होते. त्यानंतर रमेश आडसकरांविरुद्ध जिंकायचे असेल तर आपणच उमेदवार हवे अशी प्रकाश सोळंकेंनी भूमिका घेतली. विशेष म्हणजे जयसिंग माझ्या बहिणीचा मुलगा आहे, मी तर कोरा एबी फॉर्म दिला होता, आता उमेदवारी कोणाला घ्यायची हा सोळंके कुटुंबातला अंतर्गत बिषय आहे.
आम्ही जयसिंग सोळंकेंना उमेदवारी दिली असती आणि प्रकाश सोळंके यांनी 'मी काम करीत नाही ' अशी भूमिका घेतली असती तर काय करायचे असते असा सवाल देखील या क्लिपमध्ये केला आहे. दरम्यान, ज्या आडसकर यांच्या फॉर्म्युल्यानुसार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी मिळाली त्या आडसकर यांना तर तुतारीची उमेदवारी भेटली नाही.
त्यामुळे आता आम्हाला उमेदवारी हवी असा फॉर्म्युला जयसिंग सोळंके समर्थकांनी काढला आहे. समर्थक ताफ्यासह बारामती येथील अजित पवारांच्या निवासस्थानी पोचले आहेत. सकाळ पासून पवारांच्या दारासमोर समर्थक ठिय्या मांडून बसले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.