Majalgaon Assembly Constituency 2024 : अजित पवारांची साथ देणाऱ्या सोळंकेंच्या विरोधात शरद पवारांची तुतारी कोण वाजवणार ?

Ajit Pawar's candidate is fixed in Majalgaon constituency, who will Sharad Pawar field? : विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी या मतदारसंघातून आतापर्यंत चार वेळा निवडणूक लढवली आहे. पैकी दोन वेळा भाजपच्या तिकीटावर ते आमदार झाले तर 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून लढल्यावर त्यांना पराभव पत्करावा लागला.
Majalgaon Assembly Constituency News
Majalgaon Assembly Constituency Newssarkarnama
Published on
Updated on

ईश्वर खामकर

NCP v/s NCP Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंततर पुर्वीपासून पक्षाचा मजबुत गड असलेल्या बीड जिल्ह्यावर शरद पवारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पहिला दणका दिल्यानंतर आता विधानसभेत दुसरा डाव टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मैदानात उतरला आहे. स्वतः शरद पवार येत्या काही दिवसात बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडाला साथ देणारे जिल्ह्यातील धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू आहे. नुकतीच माजलगावमध्ये अजित पवार यांची जन सन्मान यात्रा झाली. यावेळी महायुतीत ही जागा आपल्याकडेच असल्याचे सांगत त्यांनी उमेदवार कोण? असेल याचे संकेत दिले होते. आता अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात शरद पवारांच्या पक्षाचा कोण तुतारी फुंकणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील सहा आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणणार, असा दावा केला आहे. या दाव्यातील हवा काढण्यासाठी शरद पवार काय खेळी करतात? याकडे सगळ्याच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जयसिंग सोळके यांना फिक्स असल्याचे बोलले जाते.

Majalgaon Assembly Constituency News
Ajit Pawar : 'विरोधक काहीही बोलतात', दिवाळखोरीच्या आरोपावर अजितदादांनी सुनावले

विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी या मतदारसंघातून आतापर्यंत चार वेळा निवडणूक लढवली आहे. पैकी दोन वेळा भाजपच्या तिकीटावर ते आमदार झाले तर 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून लढल्यावर त्यांना पराभव पत्करावा लागला. (Sharad Pawar) 2019 मध्ये याच पक्षाकडून त्यांना यश मिळाले. आता पुतण्याला उमेदवारी मिळावी, अशी शिफारस त्यांनी पक्षाकडे केल्याची माहिती आहे.

याशिवाय लोकसभेला पंकजा मुंडे यांच्यााठी काम केलेले रमेश आडसकर उमेदवारीसाठी भाजपला रामराम करत तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तर गेल्या वर्षी आई तुळजा भवानीची शपथ घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे सांगून पुन्हा माघार घेणारे मोहन जगताप हे देखील पुणे येथे शरद पवार यांची भेट घेऊन आले आहेत. माजी आमदार राधकीसन होके हे ही इच्छुकांच्या यादीत आघाडीवर आहेत. लोकसभेला बजरंग सोनवने यांना मदत करणारे डॉ नरेंद्र काळे, ईश्वर मुंडे हे देखील उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com